पत्नीला माहेरी पाठवल्याचा राग, पुणे रेल्वे पोलिसात असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने हल्ला

पत्नीला माहेरी का पाठवलं या रागातून मेहुणीवर कुऱ्हाडीने वार करुन खुनी हल्ला केल्याची घटना घडली (Sister Husband attack on Another Sister) आहे.

पत्नीला माहेरी पाठवल्याचा राग, पुणे रेल्वे पोलिसात असलेल्या मेहुणीवर कुऱ्हाडीने हल्ला

पिंपरी-चिंचवड : पत्नीला माहेरी का पाठवलं या रागातून मेहुणीवर कुऱ्हाडीने वार करुन खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या सिंधू मोहिते या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर पिंपरीतील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Sister Husband attack on Another Sister)

सिंधू मोहिते या पुणे रेल्वे पोलिसात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या देहूगाव येथील येलवाडी राहणाऱ्या बहिण मुक्ता राहाते यांच्याकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी बहिणीला मारहाण केल्याचे व्रण सिंधू यांना दिसले. त्यांनी आपली बहिण मुक्ता यांना विचारले असता, तिने पतीसोबत भांडण झाल्यानंतर मारहाणीबद्दल सांगितले.

या मारहाणीच्या घटनेमुळे सिंधू यांनी बहिण मुक्ताला आपल्या मूळ गावी पाठवले. याचाच राग मनात धरुन आरोपी विनोद हिरामण चव्हाण हा चिखलीतील कृष्णा नगर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या सिंधू यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

पत्नीला माहेरी पाठवल्याचा रागातून विनोदने रेनकोटमध्ये लपवून आणलेल्या कुऱ्हाडीने सिंधू यांच्या डोक्यात, उजव्या हातावर, मानेवर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहे. (Sister Husband attack on Another Sister)

संबंधित बातम्या : 

प्रेम प्रकरण उघड होण्याची भीती, मित्राकडूनच मित्राची गळा आवळून हत्या

मित्राची हत्या, हत्येनंतर कल्याण क्राईम ब्रांच ऑफिससमोर पान विक्री, पोलिसांनी शिताफीने छडा लावला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *