AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्या

अवैध दारु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे घेऊन जात असताना पवनी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या तस्करांकडून 100 दारुच्या पेट्या जप्त केल्या असून या दारुची किंमत जवळपास 8 लाखांच्या घरात आहे.

देशी दारुची तस्करी जोमात, भंडारा जिल्ह्यात 8 लाखांची दारु जप्त, सहा जणांना बेड्या
| Updated on: Oct 28, 2020 | 6:14 PM
Share

भंडारा : अवैधरीत्या दारुची तस्करी करणाऱ्यांचं जाळं भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फोफावल्याचं दिसत आहे. अशातच भुयार येथे अवैध दारु तस्करीविरोधात पवनी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैध दारु चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे घेऊन जात असताना पवनी पोलिसांनी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या तस्करांकडून 100 दारुच्या पेट्या जप्त केल्या असून या दारुची किंमत जवळपास 8 लाखांच्या घरात आहे. (six liquor smuggler arrested with 100 boxes of liquor in Bhandara district)

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील भुयार येथून देशी दारूची अवैधरीत्या तस्करी केली जात होती. मंगळवारी रात्री 1 ते 2 च्या सुमारास या दारूची वाहतूक चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याकडे केली जाणार असल्याची गुप्त माहिती पवनी पोलिसांना कळली. हे समजताच पोलिसांनी तस्करांना पकडण्यासाठी सापळ रचला. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी भुयार येथून स्कॉर्पियोसह 100 पेट्या देशी दारु जप्त करुन 6 जणांना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक वसंत जाधव, पोलीस उपविभागीय अधिकारी जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी केली. जप्त केलेल्या अवैध दारुचे बाजारमूल्य 7 लाख 60 हजार आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये शेजारील भंडारा तसेच नागपूर जिल्ह्यांमधून अवैधरित्या दारुचा पुरवठा होतो. अनेक बेरोजगार तरुण पैशाच्या लालसेपोटी अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पवनी पोलिसांनी भुयार येथे केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या कारवाईत एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असून अनिल अशोक कोवे (26), अनिकेत कोहपरे (22), उमेश निरंगूळवार (45), श्रीहरी रासेकर (23), त्रिपाल लांजेवार (19), अतुल हिंगे (24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पवनी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध दारु तस्करांचे धाबे दणाणले आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमध्ये दारु विक्री सुसाट, दोन आठवड्यात 5 लाखांहून अधिक ग्राहकांना दारुची होम डिलीव्हरी

नागपुरात एका दिवसात दारु विक्रीतून किती महसूल मिळाला?

पुण्यात घरपोच दारु विक्रीला परवानगी, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियमावली जाहीर

(six liquor smuggler arrested with 100 boxes of liquor in Bhandara district)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.