लॉकडाऊनपूर्वीच नोकरी गेली, पुण्यात 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुण्यातील धायरी येथे एका बावीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे (Suicide of 22 year girl in Dhayari Pune).

लॉकडाऊनपूर्वीच नोकरी गेली, पुण्यात 22 वर्षीय तरुणीची आत्महत्या

पुणे : पुण्यातील धायरी येथे एका बावीस वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे (Suicide of 22 year girl in Dhayari Pune). कोमल महादेव बांदल असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. तिने मंगळवारी (28 जुलै) राहत्या घरात आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून आपल्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नये असंही लिहून ठेवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोमल तिची आई, वडील आणि भावासोबत धायरी येथे राहात होती. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले होते. बारावीनंतर तिने नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, लॉकडाऊन पूर्वीच तिचं काम गेलं. तिचे वडील आणि भाऊ एका खासगी कंपनीत नोकरी करतात. पीडित कोमलच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

कोमलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. मात्र, मृत्यूपूर्वी आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरु नये, असं लिहून ठेवलं. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट नाही. मात्र, पोलीस तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून माहिती घेत आहेत. तसेच तिच्यावरील ताणतणावाचा तपास करत आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पोलीस तिच्या मृत्यूच्या इतर शक्यतांचाही विचार करुन चौकशी करत आहेत. तिचे नुकतेच कुणाशी वाद झाले होते का? तिच्या व्यक्तिगत आयुष्यात काही ताणतणाव निर्माण करणाऱ्या घटना घडल्या होत्या का? कुटुंबाला कुणावर संशय आहे का या सर्वच दृष्टीने पोलीस काम करत आहेत.

हेही वाचा :

Rhea Chakraborty | सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात ट्विस्ट, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा

रोह्यात बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह जंगलात सापडला

फरशीवर डोकं आपटून गळा आवळला, पिंपरीत 4 वर्षांच्या चिमुरडीची जन्मदात्रीकडून हत्या

Suicide of 22 year girl in Dhayari Pune

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *