विरारमध्ये महिलेकडून रिक्षाचालकावर चाकूने वार, रिक्षाचालकाकडूनही मारहाण

विरारमध्ये 50 वर्षीय महिला आणि एका रिक्षाचालकाची भर रस्त्यात हाणामारी झाली असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विरारमध्ये महिलेकडून रिक्षाचालकावर चाकूने वार, रिक्षाचालकाकडूनही मारहाण

मुंबई : विरारमध्ये 50 वर्षीय महिला आणि एका रिक्षाचालकाची भर रस्त्यात हाणामारी झाली असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरार पश्चिमेकडील अग्रवाल सिटी परिसरातील रिक्षा थांब्यावर दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. (Virar woman stabbed auto driver, woman also beaten by him)

या हाणामारीत महिलेने खुलेआम हातात चाकू घेऊन ‘कौन है रे तू?’ म्हणत रिक्षाचालकावर वार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. तर रिक्षा थांब्यावर उभ्या असलेल्या सर्व रिक्षाचालकांसमोर एक रिक्षाचालक महिलेला मारहाण करत असल्याचेही दिसत आहे.

याबाबत दोघांच्याही तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून महिलेवर दखलपात्र तर महिलेच्या तक्रारीवरून रिक्षाचालकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंजिती कौर-भोसले असे या चाकूने वार करणाऱ्या महिलेचे नाव असून ती 50 वर्षांची आहे. तर मारहाण करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव दुर्गेश पाटील असून तो 35 वर्षांचा आहे. सदर महिला ही अग्रवाल सिटी परिसरातील राहणारी असून ती काल आपल्या स्कुटीवरुन जात होती. तेव्हा अग्रवाल सर्कलवर महिलेची स्कुटी आणि दुर्गेश पाटील याची रिक्षा समोरासमोर आल्याने अपघात होताहोता वाचला.

यातून या दोघांमध्ये मोठा वाद झाला. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी महिलेने स्वतःजवळच्या चाकूने रिक्षाचालकावर हल्ला केला. तर रिक्षाचालकानेही तिला मारहाण केली. या दोघांच्याही तक्रारीवरून एकमेकांवर सदर घटनेप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्टे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

मुलाकडे तुझ्या प्रेम प्रकरणाचं बिंग फोडेन, सुनेला धमकावत सासऱ्याचा बलात्कार

पाणी पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली, प्रवासी महिलेला बेशुद्ध करुन लुबाडलं, लुटारु रिक्षाचालकाला बेड्या

बिहारमधून 7 वर्षीय मुलाचे अपहरण, खंडणीसाठी मुंबईतून फोन, चौघांना अटक

घराच्या वादातून दोन महिलांवर प्राणघातक हल्ला, महिलांच्या गुप्तांगावर बॅटने मारहाण, बीड हादरले

(Virar woman stabbed auto driver, woman also beaten by him)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *