AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech! या क्षेत्रात रोजगाराची कमी नाही, वाचा सविस्तर माहिती

या क्षेत्रात रोजगाराची कमतरता नाही. कॅम्पस सिलेक्शन मधूनच कंपन्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर करतात.

प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech! या क्षेत्रात रोजगाराची कमी नाही, वाचा सविस्तर माहिती
Plastic EngineeringImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 07, 2023 | 12:17 PM
Share

प्लास्टिकचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. जिथे प्लास्टिकचा वापर होत नाही अशी एकही जागा आता शोधून सापडणार नाही. त्यामुळे तुम्ही कधी असा विचार केलाय का की सगळ्यात मोठी समस्या असणाऱ्या प्लास्टिक विषयाच्या निगडीत एखादं करिअर करता आलं तर? तुम्ही बारावी पास झाला असाल किंवा परीक्षा देण्याची तयारी करत असाल तर प्लास्टिक टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

या क्षेत्रात रोजगाराची कमतरता नाही. कॅम्पस सिलेक्शन मधूनच कंपन्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर करतात. करिअर प्रशिक्षक दिनेश पाठक यांनी या अभ्यासक्रमाच्या सर्व पैलूंची माहिती दिलीये.

बीटेक इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी हा चार वर्षांचा यूजी कोर्स आहे. बारावी उत्तीर्ण झालेला कोणताही विद्यार्थी हा कोर्स करू शकतो. अभ्यासक्रमात इंजिनीअरिंग ग्राफिक्स, मेकॅनिक्स, ऑरगॅनिक केमिस्ट्री, पॉलिमर नॅनोकॉम्पोसाइट्स, प्लास्टिक मटेरियल्स, पॉलिमरायझेशन आणि पॉलिमरचा गुणधर्म अशा महत्त्वाच्या विषयांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

प्रत्येक शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभियंता म्हणून तयार करण्याचा प्रयत्न करते. बारावी उत्तीर्ण झालेले किंवा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

बारावीला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) हे विषय असणं बंधनकारक आहे. 55-60 टक्के गुण मिळवल्यास बारावीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मदत होते.

देशात अनेक खासगी संस्था आहेत, ज्या एकतर गुणवत्तेनुसार प्रवेश देतात किंवा त्यांची प्रवेश परीक्षा घेतात. सरकारी संस्था अनेकदा जेईई आणि काही राज्यांच्या माध्यमातून किंवा स्वत:च्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून प्रवेश घेतात.

सीआयपीईटी ही देशातील रायपूर, लखनौ, हाजीपूर, चेन्नई, भोपाळ, अहमदाबादसह अनेक सरकारी शैक्षणिक संस्था आहेत. खासगी कॉलेजपेक्षा फी खूपच कमी आहे. यापैकी एखाद्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत.

गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैदराबाद, युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र, आर्यभट्ट नॉलेज युनिव्हर्सिटी, बिहार यासारख्या संस्थांमध्येही प्रवेश घेऊन विद्यार्थी आपले भविष्य उज्ज्वल करू शकतात.

प्रवेश प्रक्रियेतून जात असाल, तेव्हा बीटेकमध्ये अनेक कोर्सेस दिसतील. उदाहरणार्थ, बहुतेक सीआयपीईटीमध्ये बीई-प्लास्टिक अभियांत्रिकी, बीई-मॅन्युफॅक्चरिंग अभियांत्रिकीमध्ये यूजी अभ्यासक्रम आहेत. काही कारणास्तव प्रवेश शक्य नसला तरी निराश होऊ नका.

या सर्व संस्थांमध्ये प्लास्टिक इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ते साधारणत: दीड ते तीन वर्षांचे असतात.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.