नांदेडमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी, सात शाळांना ‘कारणे दाखवा’

नांदेडमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपी, सात शाळांना 'कारणे दाखवा'
नांदेड जिल्हा परिषदेने 7 शिक्षण संस्थांना पाठवल्या नोटीस.
Image Credit source: TV9

राज्यामध्ये बारावीचे पेपर (Exam) सध्या सुरू आहेत. मात्र, सातत्याने बारावीच्या पेपर फुटीसंदर्भात बातम्या पुढे येत आहेत. अगोदर मुंबई येथील साठे काॅलेजमधील (College) प्रकरण, त्यानंतर अहमदनगर जिल्हामध्ये तर परीक्षेच्या अगोरदच उत्तर पत्रिकेसह सोशल मीडियावर बारावी गणिताचा पेपर व्हायरल झाला होता.

राजीव गिरी

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 17, 2022 | 9:42 AM

नांदेड : राज्यामध्ये बारावीचे पेपर (Exam) सध्या सुरू आहेत. मात्र, सातत्याने बारावीच्या पेपर फुटीसंदर्भात बातम्या पुढे येत आहेत. अगोदर मुंबई येथील साठे काॅलेजमधील (College) प्रकरण, त्यानंतर अहमदनगर जिल्हामध्ये तर परीक्षेच्या अगोरदच उत्तर पत्रिकेसह सोशल मीडियावर बारावी गणिताचा पेपर व्हायरल झाला होता. आता बारावी परीक्षेसंदर्भातच एक धक्कादायक बातमी येते आहे. नांदेडमध्ये (Nanded) 7 परीक्षा केंद्रांना चक्क शिक्षण विभागाने कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत.

7 परीक्षा केंद्रांना शिक्षण विभागाच्या नोटीस

कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, राज्यामध्ये काॅप्या आणि पेपर फुटीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकारी यांच्या भरारी पथकाला कॉप्य , गाईड आणि चिठ्या आढळून आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावरील शिक्षक बेजबाबदारपणे वागत असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यानी पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांकडून हमीपत्र लिहून घेऊन त्यांना सोडून देण्यात आले आहे.

परीक्षा केंद्र बघितल्यानंतर भरारी पथकाला बसला धक्काच

शिक्षण विभागाच्या या धडक कारवाईनंतर अनेक संस्थांनी मोठा धसका घेतल्याचे दिसते आहे. एकाच वेळी शिक्षण विभागाने जिल्हातील 7 शिक्षण संस्थांना नोटीस पाठवली आहे. मुंबईच्या पेपर फुटीसंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की, पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू आहे. याप्रकरणात शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये निवेदन देखील दिले होते. विशेष म्हणजे मुंबईमध्ये तर पेपर फुटीसंबंधात एका खासगी शिकवणीच्या चालकाला अटक देखील करण्यात आल्याची चर्चा आहे.

संबंधित बातम्या : 

SSC Exam : दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार केल्यास मान्यता रद्द करु, वर्षा गायकवाड यांचा शाळांना इशारा

Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प नामंजूर, शिक्षण क्षेत्रातील दुर्मिळ घटना


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें