AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोंधळ सुरूच… आता इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालय निवड यादी या तारखेला जाहीर होणार; पटापट तारीख तपासा

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तांत्रिक अडचणींनंतर महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीसाठी महाविद्यालय निवड यादी जाहीर करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे.

गोंधळ सुरूच... आता इयत्ता अकरावीसाठी महाविद्यालय निवड यादी या तारखेला जाहीर होणार; पटापट तारीख तपासा
11th admission
Updated on: Jun 27, 2025 | 7:37 PM
Share

दहावीचा निकाल लागून दीड महिना उलटला आहे. मात्र अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तांत्रिक अडचणींनंतर महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीसाठी महाविद्यालय निवड यादी जाहीर करण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) 2025 CAP फेरी 1 ची गुणवत्ता यादी आता 30 जून 2025 रोजी जाहीर होणार आहे. याआधी ही यादी 26 जून रोजी जाहीर होणार होती, मात्र काही समस्यांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे.

FYJC ची पहिली यादी mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. गुणवत्ता यादीसोबत राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी कट-ऑफ गुण आणि इतर डेटा देखील प्रसिद्ध केला जाणार आहे. सेंट्रलाइज्ड अॅडमिशन प्रोसेस (CAP) मध्ये 12.7 लाखांहून अधिक विद्यार्थी भाग घेतलेला आहे. या द्वारे 9435 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

FYJC पहिली गुणवत्ता यादी कशी डाउनलोड करायची?

  • सर्वप्रथम mahafyjcadmissions.in या अधिकृत पोर्टलवर जा.
  • FYJC पहिली गुणवत्ता यादी डाउनलोड करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणजे अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका आणि एंटर करा.
  • यानंतर तुम्हाला मिळालेले कॉलेज पहा आणि यादी डाउनलोड करा.

हा डेटाही पाहता येणार

तुम्हाला CAP फेरी 1 साठी असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची यादी दिसेल. तसेच इतर सर्व महाविद्यालयांसाठी संपूर्ण कट-ऑफ यादीही पाहता येईल. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देण्याते आवाहन केले आहे.

शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!
शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार!.
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
मुद्द्यांची चर्चा गुद्द्यांवर! मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी.
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत
फडणवीसांनी सुनावलं, शिंदेंनी चांगलच झापलं! शिरसाट आणि गायकवाड अडचणीत.
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत
तेव्हा मला पक्षाने साथ दिली नाही..; प्रकाश महाजनांनी बोलून दाखवली खंत.
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक
मी जातोय, पण..; राष्ट्रवादीच्या बैठकीत फूल मेलोड्रामा,जयंत पाटील भावूक.
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली
कचरा.. शी.. शी.. शी..; राणेंना पाहून आदित्य ठाकरेंनी उडवली खिल्ली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेशाध्यक्षपदाची धुरा शशिकांत शिंदेंवर.
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले.
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान
मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान.
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..
मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्...