AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICSE 10th Exam 2025: आजपासून ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा, केंद्रावर ‘या’ गोष्टी नेऊ नये

ICSE 10th Exam 2025: आयसीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. ही परीक्षा 27 मार्चपर्यंत चालणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून परीक्षा सुरू होणार असून, त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत बोर्डाने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. जाणून घ्या.

ICSE 10th Exam 2025: आजपासून ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा, केंद्रावर ‘या’ गोष्टी नेऊ नये
आजपासून ICSE बोर्डाची दहावीची परीक्षाImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 18, 2025 | 12:18 PM
Share

ICSE 10th Exam 2025: कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (ICSE) ICSE बोर्डाची दहावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून घेणार आहे. या परीक्षेचा समारोप 27 मार्च रोजी होणार आहे. परीक्षेची सुरुवात इंग्रजी भाषेने होईल. सकाळी 11 वाजता सुरू होणारी ही परीक्षा दोन तास चालणार आहे. यावर्षी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी अगोदरच लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.

30 मिनिटे आधी गेट बंद होतील

उमेदवारांना परीक्षेच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल, कारण त्यानंतर गेट बंद केले जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत गेट उघडले जाणार नाही. पेपर संपण्यापूर्वी परीक्षा हॉलमधून बाहेर पडू दिले जाणार नाही, असा इशाराही बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे. या परीक्षेचा निकाल मे 2025 मध्ये जाहीर करण्यात येईल, असे बोर्डाने म्हटले आहे.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • एखाद्या उमेदवाराने प्रश्नपत्रिकेबाबत परीक्षा केंद्राशी संबंधित कोणत्याही व्यक्तीची किंवा परीक्षा केंद्राच्या आत किंवा बाहेरील कोणाचीही अवाजवी पद्धतीने मदत घेण्याचा प्रयत्न केल्यास ICSE बोर्ड त्या उमेदवाराची संपूर्ण परीक्षा रद्द करेल. त्यामुळे उमेदवारांनी याची विशेष काळजी घ्यावी.
  • परीक्षेशी संबंधित कोणत्याही प्रकारची फसवणूक केल्याचे आढळल्यास त्याची माहिती ICSE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिवांना दिली जाईल आणि त्यांना परीक्षा हॉलमधून काढून टाकले जाऊ शकते आणि आगामी परीक्षेस बसण्यापासून रोखले जाऊ शकते.
  • जर एखादा उमेदवार चुकीच्या पद्धतीने उत्तरपत्रिका काढण्याचा प्रयत्न करताना किंवा उत्तरपत्रिका बदलण्याचा प्रयत्न करताना आढळला तर त्याची माहिती ICSE चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिवांना दिली जाईल आणि त्यानंतर त्याची संपूर्ण परीक्षा रद्द केली जाईल.
  • परीक्षेच्या निकालासंदर्भात प्रभावित करण्याच्या हेतूने एखाद्या उमेदवाराने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ICSE च्या परीक्षक किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याशी संपर्क साधल्याचे आढळल्यास त्याचा निकाल पूर्णपणे रद्द केला जाईल.

परीक्षेच्या हॉलमध्ये ‘या’ वस्तू नेऊ नका

उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये कोणतीही पुस्तके, पॉकेट बुक, नोट्स, पेपर, कॅल्क्युलेटर, मोबाइल फोन किंवा वायरलेस डिव्हाइस ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे असे कोणतेही शस्त्र नसावे, जे परीक्षेच्या वेळी शस्त्र म्हणून वापरता येईल. जर कोणी असे करताना आढळले तर त्याची परीक्षा रद्द केली जाईल आणि त्याच्यावर परीक्षेवर बंदी देखील घातली जाऊ शकते.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी