IGNOU Exam Form 2021: इग्नू्च्या सत्र परीक्षांचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ, 3 ऑगस्टपासून परीक्षांना सुरुवात

IGNOU Exam Form 2021: इग्नू्च्या सत्र परीक्षांचे अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ, 3 ऑगस्टपासून परीक्षांना सुरुवात
इग्नू

इग्नूकडून सत्र परीक्षा 2021 चं आयोजन 15 जूनपासून करण्यात येणार होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहता ते लांबणीवर टाकण्यात आलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 10, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जूनमध्ये होणाऱ्या सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची लिंक पुन्हा चालू केली आहे. इग्नूकडून सत्र परीक्षा 2021 चं आयोजन 15 जूनपासून करण्यात येणार होतं. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहता ते लांबणीवर टाकण्यात आलं आहे. नवीन नोटीस नुसार इग्नूच्या परीक्षा 3 ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहेत. इग्नूच्या जूनमधील सत्र परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. (IGNOU June TEE 2021 submission of application form date extended till 12 July click here for online link ignou nic in)

IGNOU ने, जून 2021 टर्म-एंड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म जमा करण्यासाठी मुदत 9 जुलैपर्यंत वाढवून दिली होती. ऑनलाईन लिंक सुरु ठेवण्यात आली असून विद्यार्थी इग्नूच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. विद्यार्थ्यांकडून आनलाईन अर्ज जमा केले जात आहेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ignou.ac.in या वेबसाईटवर भेट द्यावी.

IGNOU Term End Exam 2021 साठी अर्ज कसा करायचा?

स्टेप 1:सर्वात आधी ignou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. स्टेप 2: त्यानंतर होमपेजवर जाऊन रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: होमपेज उघडेल. त्यावर Term End Exam या लिंकवर क्लिक करा स्टेप 4: अर्जामधील माहिती अचूकपणे भरा

शुल्कही ऑनलाईन भरावे लागणार

शेवटी तुम्हाला नोंदणी शुल्क भरण्याचा पर्याय दिसेल. त्यावर जाऊन शुल्क भरल्यानंतर तुमची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. भविष्यात कोणतीही अडचण होऊ नये म्हणून तुम्ही त्याची प्रिंटही काढू शकता. विद्यार्थी त्यांचे परीक्षा अर्ज इग्नूच्या वेबसाईटवर जाऊन भरू शकतात. 12 जुलैपर्यंत कसल्याही प्रकारचं विलंब शुल्क आकारलं जाणार नाही.तर प्रत्येक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना 200 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. ते परीक्षा शुल्क कोणत्याही कारणामुळे परत केलं जाणार नाही.

3 ऑगस्टपासून परीक्षेला सुरुवात

इग्नूच्या जून सत्राच्या परीक्षांना 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. इग्नूच्या पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे. अभ्यासक्रमनिहाय परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी यासाठी नियमितपणे इग्नूच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे.

संबंधित बातम्या:

इग्नूने संस्कृतमध्ये सुरू केला प्रमाणपत्र अभ्यासक्रम, जाणून घ्या पात्रता व फी काय आहे ते

JEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेसाठी आजपासून नोंदणी सुरु, अर्ज करण्यासाठी वाचा सविस्तर

(IGNOU June TEE 2021 submission of application form date extended till 12 july click here for online link ignou nic in)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें