AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IIT Bombay: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, डिसेंबरपासून कॅम्पसमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु

आयआयटी मुंबईनं प्रदीर्घ काळानंतर कॅम्पस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीच्या द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग सुरू केले जातील.

IIT Bombay: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी, डिसेंबरपासून कॅम्पसमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु
IIT Bombay
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 7:00 AM
Share

मुंबई : आयआयटी मुंबईनं प्रदीर्घ काळानंतर कॅम्पस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पदवीच्या द्वितीय वर्ष आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन वर्ग सुरू केले जातील. अभ्यासक्रमाचे तीन सत्र ऑनलाईन झाल्यानंतर, विद्यार्थी पुढील शिक्षण ऑफलाईन घेण्यासाठी कॅम्पसमध्ये येऊ शकतात. आयआयटी मुंबईकडून डिसेंबरपासून कॅम्पस सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 2020 मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आता पहिल्यांदा कॅम्पसमध्ये जाण्याची संधी मिळेल. कोरोनामुळे वर्षभर ऑनलाईन क्लासेस घेतले जात होते त्यामुळं नवीन विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जायला मिळाले नव्हते. मात्र, आता ऑफलाईन शिक्षण सुरु होत असल्यानं विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जाता येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

आयआयटी-बॉम्बेचे संचालक एस सुदर्शन म्हणाले की, आम्ही सर्व द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. कॅम्पसमध्ये अध्ययन आणि अध्यापनाचं काम सुरु होणार असल्यानं विद्यार्थी खूप आनंदी आहेत. विद्यार्थी कॅम्पसमधील क्लासेसचीही खूप उत्सुकतेने वाट पाहत आहेत, असं एस. सुदर्शन म्हणाले आहेत. अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांपूर्वीच कॅम्पसमध्ये येण्यास सांगितले होते, परंतु काही विद्यार्थी आले होते तर काही जणांनी ऑनलाईनचा पर्याय स्वीकारला. 3 जानेवारीपासून वर्ग सुरू होणार आहेत, त्यापूर्वी विद्यार्थी कॅम्पसमध्ये उपस्थित राहण्याची शक्याता आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि पीएचडीचे विद्यार्थी वसतिगृहामध्ये वास्तव्यासाठी दाखल झाले आहेत.

कोरोना लसीकरण अनिवार्य

कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर आता कॅम्पस पूर्णपणे सुरू करण्याचा निर्णय आयआयटी मुंबईकडून घेण्यात आला आहे. संस्थेने सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सर्व कोरोना लस घेण्याच्या सूचना दिल्या. कॅम्पसमध्ये पाच नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर संस्था सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची लसीकरण प्रमाणपत्रेही जमा करुन घेतली जाणार आहेत. ज्यांनी अद्याप लसीकरण केलेले नाही, त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, त्यानंतर त्यांनाही लसीकरण केले जाणार असल्याचं कळवण्यात आलं आहे.

आयआयटी मुंबईमध्ये नवीन अभ्यासक्रम

दरम्यान, आयआयटी मुंबईमध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि मोटर्स (EVs) हे दोन नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले गेले आहेत. कोर्सेरा सोबत सामंजस्य करार करून हे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं शिकवले जातील.

इतर बातम्या:

NAS 2021 : नॅशनल ॲचिव्हमेंट सर्वेक्षण यशस्वी, 96 टक्के शाळा तर 92 टक्के विद्यार्थी सहभागी

NTA UGC NET 2021: नेट परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 20 नोव्हेंबरपासून परीक्षेला सुरुवात

Iit bombay to reopen campus in December for second third year students

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.