Jammu kashmir News: दहशतवाद्यांच्या आयडॉलॉजिवर प्रहार; जमात-ए-इस्लामीच्या 300 हून अधिक शैक्षणिक संस्थांना कुलूप

प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी या मातृसंस्थेशी निगडीत काश्मीर खो-यातील 300 हून अधिक शैक्षणिक संस्थांना अखेर दणका देण्यात आला. मुलांवर देशविघातक आयडॉलॉजीचा प्रसार आणि प्रचार करणा-या या संस्था कधीच्याच रडारवर होत्या. या संस्थांमधील शैक्षणिक उपक्रमांना पायबंद घालण्यात आला आहे. शाळांना कुलुप ठोकण्यात येणार आहे.

Jammu kashmir News: दहशतवाद्यांच्या आयडॉलॉजिवर प्रहार; जमात-ए-इस्लामीच्या 300 हून अधिक शैक्षणिक संस्थांना कुलूप
दहशतवादाच्या मुळावर घाव Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 1:04 PM

श्रीनगरः काश्मीर खो-यात( kashmir vally) अशांतता माजवणाण्यासोबतच देशविघातक कारवायांमध्ये सहभागी प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी संघटनेला (jamaat-e-islami) सरकारने दणका दिला आहे. या संघटनेच्या दहशतवादी कारवायांवर सरकार लक्ष ठेऊन असते. ही संस्था काश्मीर खो-यात अनेक उपक्रम राबविते. त्यात त्यांच्या शैक्षणिक संस्था, मदररसे आणि इतर कार्य चालविले जाते. या शैक्षणिक संस्थांसाठी (Education Society) संघटनेने बंदुकीच्या दहशतीवर अनेक जमिनीवर अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे. जमात-ए-इस्लामी या या मातृसंस्थेशी निगडीत काश्मीर खो-यातील 300 हून अधिक शैक्षणिक संस्थांना अखेर दणका देण्यात आला. मुलांवर देशविघातक आयडॉलॉजीचा (ideology) प्रसार आणि प्रचार करणा-या या संस्था कधीच्याच रडारवर होत्या. 15 दिवसांत या शैक्षणिक संस्था सील(Seal) करण्यात येतील. यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये दाखल होता येईल.

नवीन विद्यार्थी दाखल करण्यास प्रतिबंध

जम्मु आणि काश्मीर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने (State Education Board) याविषयीचा आदेश दिला आहे. त्यानुसार, या प्रतिबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना चालू सत्रासाठी जवळच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेता येईल. शिक्षणाधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षण संचालक यांनी या शैक्षणिक संस्थांमधून येणा-या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर प्रतिबंधित जमात ए इस्लामी या संघटनेशी संबंधित फलाह -ए-आम(FAT) या शैक्षणिक संस्थेत नवीन विद्यार्थी प्रवेशाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. शिक्षण संचालक, शिक्षणाधिकारी (Education Officer) यांना या संस्थेत प्रवेश रोखण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

संस्था अनेक बेकायदेशीर कृत्यात सहभागी

फलाह-ए-आम संबंधित अनेक शाळांची गडबडी राज्य पोलिसांच्या तपासात उघड झाली. बंदुकीच्या धाकावर या संस्थेने अनेक ठिकाणी सरकारी मालमत्तेवर अवैध कब्जा केला (Illegal Capturing). अनधिकृतपणे जमिनी हडपल्याचे समोर आले आहे. फसवणूक आणि खो-यात अशांतता माजवण्यात ही संस्था अग्रेसर असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामीची पाळमुळे या शैक्षणिक संघटनेशी जोडल्याचे ही समोर आले. त्यानंतर हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ही प्रतिबंधीत संघटना खो-यात अनाथलय, मदरसे, शैक्षणिक कार्यात सक्रिय असल्याचे तपासात समोर आले. या संघटनेवर खो-यात 2008, 2010 आणि 2016 मध्ये मोठया प्रमाणात अशांतता (Illegal Activities) माजवली आहे. तसेच ही संघटना त्यांची आयडॉलॉजीही विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असल्याचे समोर आले आहे.

स्थानिक अधिकारी ही रडारवर

ही संस्था बंदुकीच्या धाकावर फोफावली. तिने महसूल खात्याच्या (Revenue Department) अधिका-यांना चिरीमिरी देऊन अनेक सरकारी जागांवर अवैध कब्जा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संस्थाचे 300 च्यावर विविध शैक्षणिक शाळा सुरु आहेत. या सर्वांचीच आता व्यापक चौकशी करण्यात येणार आहे. दहशतवादी कारवायांशीसंबंधित अशा संघटनांना पाठिशी घालणा-या आणि कागदोपत्री त्यांना सहकार्य करणारे अधिकारी ही या चौकशीत रडारवर आले आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.