NIRF Ranking : देशातील टॉप 10 विद्यापीठांमध्ये जेएनयू दुसऱ्या क्रमांकावर, पहा संपूर्ण यादी

एकूण संस्थांच्या श्रेणीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला क्रमवारीत नववे स्थान मिळाले आहे, तर जामिया मिलिया इस्लामियाला 13 वे आणि दिल्ली विद्यापीठाला 19 वे स्थान मिळाले आहे.

NIRF Ranking : देशातील टॉप 10 विद्यापीठांमध्ये जेएनयू दुसऱ्या क्रमांकावर, पहा संपूर्ण यादी
देशातील टॉप 10 विद्यापीठांमध्ये जेएनयू दुसऱ्या क्रमांकावर
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 7:18 PM

नवी दिल्ली : शिक्षण मंत्रालयाच्या वार्षिक राष्ट्रीय संस्थागत रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) -2021 मध्ये, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये द्वितीय स्थान कायम राखले आहे, तर जामिया मिलिया इस्लामियाने सहावे स्थान मिळवले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एनआयआरएफच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन केले. यामध्ये दिल्ली विद्यापीठ (DU) 12 व्या स्थानावर गेले तर गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या क्रमवारीत 16 अंकांनी सुधारणा झाली. गेल्या वर्षी दिल्ली विद्यापीठ 11 व्या क्रमांकावर होते. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे रँकिंग यंदा 45 व्या स्थानावरून 42 व्या स्थानावर आली आहे. (JNU ranks second among the top 10 universities in the country, see full list)

एकूण संस्थांच्या श्रेणीमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला क्रमवारीत नववे स्थान मिळाले आहे, तर जामिया मिलिया इस्लामियाला 13 वे आणि दिल्ली विद्यापीठाला 19 वे स्थान मिळाले आहे. वैद्यकीय संस्थांच्या श्रेणीमध्ये, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीला प्रथम स्थान मिळाले. महाविद्यालयांच्या श्रेणीमध्ये, मिरांडा हाऊस, नवी दिल्लीला प्रथम, लेडी श्री राम कॉलेज फॉर वूमनला द्वितीय आणि सेंट स्टीफन्स कॉलेजला आठवे स्थान मिळाले.

ही आहेत टॉप 10 विद्यापीठे

1. भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू, कर्नाटक – 82.67 2. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली – 67.99 3. बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस, यूपी – 64.02 4. कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता, पश्चिम बंगाल – 62.06 5. अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर, तामिळनाडू – 61.23 6. जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली – 60.74 7. मणिपाल उच्च शिक्षण अकादमी, मणिपाल, कर्नाटक – 60.58 8. जादवपूर विद्यापीठ, कोलकाता, पश्चिम बंगाल – 60.33 9. हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद, तेलंगणा – 59.71 10. अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ, यूपी – 58.97

NIRF म्हणजे काय?

नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) कामगिरीच्या आधारावर देशातील सर्वोच्च विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांना रँक करण्याचे काम करते. यामध्ये देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता मोजली जाते. 2015 मध्ये NIRF ची रँकिंग सुरू झाली. रँकिंग फ्रेमवर्क पॅरामीटर्सच्या 5 व्यापक सामान्य गटांवर संस्थांचे मूल्यांकन करते. यामध्ये टीचिंग, लर्निंग अँड रिसोर्सेस (TLR), रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (RP), ग्रॅज्युएशन आउटकम (GO), आउटरीच अँड इन्क्लुसिविटी (OI) आणि परसेप्शन (PR) यांचा समावेश आहे. पॅरामीटर्सच्या या पाच विस्तृत गटांपैकी प्रत्येकासाठी दिलेल्या गुणांच्या एकूण रकमेच्या आधारावर रँक दिले जातात. (JNU ranks second among the top 10 universities in the country, see full list)

इतर बातम्या

आता घरबसल्या ऑर्डर करा Jio सिमकार्ड, कंपनीकडून घरपोच डिलिव्हरी मिळणार

Photo : कोरोनाचं संकट दूर कर, शेतकऱ्यांना बळ दे; देवेंद्र फडणवीसांचं गणरायाला साकडं

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.