Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, असा चेक करा निकाल…

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Akshay Adhav

Updated on: Jun 30, 2021 | 10:06 AM

महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. (Maharashtra board SSC And HSC result 2021 may Be Declared in 15 July)

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता, असा चेक करा निकाल...
कोरोनामध्ये अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresult.nic वर जाहीर केला जाईल. दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या (अंतर्गत गुण) घेण्यात आलेल्या परीक्षांवर आधारित असेल. तर जे विद्यार्थ्याने आपल्या गुणांबाबत समाधानी नाही, ते विद्यार्थी नंतर परीक्षा देऊ शकतात, असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वीच सांगितलंय. (maharashtra board SSC And HSC result 2021 may Be Declared in 15 July)

बारावीच्या निकालाचे मूल्यांकन धोरण लवकरच ठरणार

महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल 2021 (एचएससी निकाल 2021) निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर करण्यात येईल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केल्यानुसार, यावर्षी राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केलं जाईल आणि त्यांच्या गुणांचे अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील.तसंच मूल्यांकन निकष देखील लवकरच जाहीर केले जातील, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

निकाल कसा चेक करावा :

  • सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जावं.
  • होम पेजवरील SSC परीक्षा निकाल 2021 लिंकवर क्लिक करा.
  • एक नवीन पेज स्क्रीनवर दिसेल.
  • आपल्या रोल नंबरसह मागितलेली अन्य माहिती येथे भरा.
  • सबमिट वर क्लिक करा.
  • आता SSC निकाल 2021 आपल्या स्क्रीनवर दिसून येईल.

Maharashtra Board SSC And HSC result 2021 may Be Declared in 15 July)

हे ही वाचा :

कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ होणार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा निर्णय

CBSE ने लॉंच केलं हँडबुक, इयत्ता 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांना ‘हँडक्राफ्ट’ शिकण्याची संधी

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षेचं काय होणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI