AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET UG Answer Key 2022: नीट युजी Answer Keyआज जाहीर होण्याची शक्यता, निकालही लवकरच!

त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी किमान 45 पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा कट ऑफ 720 ते 138 दरम्यान होता.

NEET UG Answer Key 2022: नीट युजी Answer Keyआज जाहीर होण्याची शक्यता, निकालही लवकरच!
NEET UG Answer KeyImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 18, 2022 | 11:49 AM
Share

नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट अंडरग्रॅज्युएटची आन्सर कि (NEET UG Answer Key) आज जाहीर होण्याची शक्यता आहे. उत्तर की जाहीर झाल्यानंतर, उमेदवार neet.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. एनटीए एनईईटी यूजी 2022 उत्तर की संदर्भात आक्षेप घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध करून देईल. अधिकृत वेबसाइटवर (Official Website) उमेदवारांना तसे करण्याचा पर्याय असेल. त्यासाठी त्यांना neet.nta.nic.in लॉगइन करावं लागतं. आन्सर की संदर्भात घेण्यात आलेल्या आक्षेपाचा आढावा घेतल्यानंतर अंतिम उत्तर की आणि स्कोअरकार्ड (Answer Key And Scorecard) या महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नीट यूजी 2022 च्या निकालासोबतच गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात येणार आहे. नीट यूजी परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती आणि यावर्षी 18 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दरवर्षी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. देशातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) दिल्ली, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (पीजीआयएमईआर) चंदीगड, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज (सीएमएस) वेल्लोर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (एनआयएमहन्स) बेंगळुरू, संजय गांधी पोस्टग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसजीपीजीआयएमएस) लखनौ यासारख्या देशातील अव्वल वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एनईईटीच्या आधारे प्रवेश दिला जातो.

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी किती मार्क्स लागतात?

नीट यूजी 2022 पर्सेंटाइल हे ‘नीट’मधील ऑल इंडिया कॉमन मेरिट लिस्टमध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुणांच्या आधारे निश्चित करण्यात येणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 50 पर्सेंटाइल आणावे लागणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान 40 पर्सेंटाइल गुण मिळवावे लागतील. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी किमान 45 पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता भासणार आहे. गेल्या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गासाठीचा कट ऑफ 720 ते 138 दरम्यान होता. त्याचबरोबर अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा कट ऑफ 137 ते 108असा होता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.