AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय? विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा, संसदीय समितीकडून महत्त्वाची शिफारस काय?

नीट यूजी (NEET UG) परीक्षा वर्षातून २ ते ३ वेळा घेण्याची शिफारस संसदीय समितीने केली आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी एनटीएने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.

NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय? विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा, संसदीय समितीकडून महत्त्वाची शिफारस काय?
NEET UG Exam
| Updated on: Jun 11, 2026 | 12:55 PM
Share

देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणाऱ्या नीट यूजी (NEET UG) वैद्यकीय प्रवेश परीक्षेबाबत सध्या देशभरात मोठी चर्चा सुरू आहे. ही परीक्षा वर्षातून दोन किंवा तीन वेळा घेतली जावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस आरोग्य आणि कुटुंब कल्याण विषयक संसदीय स्थायी समितीने केली आहे. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी आणि त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ही शिफारस करण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप यावर कोणताही शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

अधिकारी तिसऱ्यांदा संसदीय समितीसमोर हजर

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात झालेल्या नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यातील नियोजनासाठी गेल्या काही आठवड्यांत सरकारी अधिकारी तिसऱ्यांदा संसदीय समितीसमोर हजर झाले. या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (NTA) महासंचालक अभिषेक सिंह, उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे (NMC) अध्यक्ष अभिजात सी. सेठ यांनी समितीसमोर आपली बाजू मांडली. संसदीय समितीच्या सदस्यांनी या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंत झालेल्या तपासाचा आणि पुढील उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

पेपरफुटीवर तीव्र चिंता व्यक्त

समितीच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीची समस्या ही आता केवळ एक वेळची घटना राहिलेली नाही, तर ती एक दीर्घकालीन समस्या बनत चालली आहे. ही घटना २०२४ मध्ये आणि पुन्हा २०२६ मध्ये घडल्यामुळे यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गोंधळाला जबाबदार कोण? उत्तरदायित्व कसे निश्चित करणार? आणि भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी सध्याची शिक्षा पुरेशी आहे का? असे सवाल सातत्याने उपस्थित होत आहेत. त्यातच दुसऱ्या कोणाच्या तरी चुकीमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणे अत्यंत क्लेशदायक आहे, म्हणूनच परीक्षा एकापेक्षा जास्त वेळा घेण्याचा पर्याय समोर आला आहे.

यापूर्वीही झाली होती घोषणा, पण अंमलबजावणी नाही

नीट परीक्षा वर्षातून अनेक वेळा घेण्याची मागणी नवीन नाही. यापूर्वी २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एनटीएमार्फत जेईई (JEE Main) आणि नीट (NEET) या दोन्ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, अशी घोषणा केली होती. मात्र, त्याची कधीही अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर २०२३ मध्ये राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) म्हटले होते की, एमबीबीएसच्या (MBBS) सर्व जागा एकाच समुपदेशन (Counseling) प्रक्रियेद्वारे भरल्या जात असल्याने, परीक्षा वर्षातून दोनदा घेणे तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणार नाही. परंतु, आताच्या गंभीर परिस्थितीनंतर या निर्णयावर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार सुरु असल्याचे बोललं जात आहे.

२१ जून रोजी होणार फेरपरीक्षा 

दरम्यान, मे महिन्यात रद्द झालेली नीट यूजी परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा असल्याने, यावेळी पेपरफुटीला किंवा कोणत्याही गैरप्रकाराला थोडाही वाव राहणार नाही, याची खात्री सरकारने आणि एनटीएने केली आहे. यासाठी परीक्षा केंद्रांवर कडक सुरक्षा आणि विस्तृत व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

Follow Us
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
Gulabrao Patil on Uddhav Thackeray | आंदोलनाने सरकार बदलत नाही! उद्धव ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे थेट प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
Dahanu | डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास, घटना CCTV मध्ये कैद
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3 तास बैठक
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया
Sushma Andhare | फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; दिल्ली आंदोलनावर सुषमा अंधारेंची सडेतोड प्रतिक्रिया
सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
CJP Protest | सीजेपीच्या आंदोलनातील हादवणारे फुटेज समोर, पहाच...
कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह...
Kalyan Dombivali | कल्याणमध्ये दृश्यम स्टाईल हत्याकांड; प्रियकराचा खून करून मृतदेह गोणीत लपवला, प्रेयसी फरार
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!.

Video : अरे कसलं संरक्षण देताय, पोलिसांवर महिला प्रचंड संतापली, राऊतांनी ट्वीट करत केलं कौतुक!

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप.

CJP Protest Delhi : दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर, पोलिसांवर गंभीर आरोप

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा.

जरांगे विरुद्ध मुंडे संघर्ष पेटला! धनंजयला कसं मंत्री करतात ते बघतोच, जरांगेंचा इशारा

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की….

CJP च्या निदर्शकांवर दिल्लीत लाठीमार, अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया आली, म्हणाले की…

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!.

सरकारवर दबाव टाकता येत नाही, गोंधळ घालून विरोध करणं अयोग्य, CJP च्या आंदोलनावर कंगना रनौत यांची टीका!

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा.

IMD weather update : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, आयएमडीचा हाय अलर्ट, गरज असेल तरच घराबाहेर पडा