AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होऊ शकतात का? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही, कसं शक्य आहे ते सांगितलं

Sunil Tatkare : "दोन बाबी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीमध्ये गेले. पक्ष नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची भेट झाली असेल. नेमकी भेट कशामुळे झाली मला माहिती नाही"

Sunil Tatkare : श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होऊ शकतात का? सुनील तटकरेंनी शक्यता नाकारली नाही, कसं शक्य आहे ते सांगितलं
Sunil Tatkare
| Updated on: Jul 26, 2026 | 2:59 PM
Share

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाला यश मिळालं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर एक नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या शिक्षण खात्याचा भार प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवला आहे. पण त्याजागी श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागू शकते का? यावर सुनील तटकरे बोलले आहेत. श्रीकांत शिंदे शिक्षण मंत्री होणार का?. “तो निर्णय नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा असतो. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला उज्वल असे यश महाराष्ट्रमध्ये मिळाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार विलीन झाले. शिंदे साहेबांनी ताकद लोकशाहीच्या माध्यमातून सिद्ध केली. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असतो, त्या संदर्भात निर्णय एनडीएचं नेतृत्व घेत असतं. नेमक्या किती जागा शिवसेनेला द्यायच्या, कोणत्या पक्षाला द्यायचं हा अधिकार त्यांचा आहे. तो दिल्यानंतर कोणाला मंत्री करावं, हा अधिकार एकनाथ शिंदे यांचा आहे” असं तटकरे म्हणाले.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज ठाकरे बंधुंनी विजयी सभा घेतली. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शेवटी कोणी कोणत्या विषयावरती काय भावना व्यक्त कराव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार सर्वांना अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस विद्यार्थी संवाद केला. चर्चा करण्यासाठी निरोप पाठवले. नवीन पिढीमध्ये असलेल्या भावना याचा सन्मान मोदी करत आहेत. लोकशाहीच्या पद्धतीने निर्णय झाला आहे” असं सुनील तटकरे म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर तटकरे म्हणाले की, “दोन बाबी आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीमध्ये गेले. पक्ष नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाशी त्यांची भेट झाली असेल. नेमकी भेट कशामुळे झाली मला माहिती नाही”

दोन्ही राष्ट्रवादी विलीनी करण्याची चर्चा कुठेही नाही

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर सुद्धा ते बोलले. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत यापूर्वीच सुप्रियाताई ,श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले आहे. परंतु राजकारणामध्ये आपण म्हणतात त्याप्रमाणे आज तरी दोन्ही राष्ट्रवादी विलीनी करण्याची चर्चा कुठेही नाही. योग्यवेळी तशा प्रकारची चर्चा सुरू झाली तर, त्यावेळेचा विचार त्यावेळेस होईल. मात्र आता विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे बंद आहे” असं तटकरे म्हणाले.

Follow Us
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी