AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: दुसऱ्या मॅचमध्ये 81 धावा केल्या अन् तिसऱ्या सामन्यात संघातून बाहेर होणार, इशान किशनसोबत असा अन्याय का?

भारत झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार आहे. ज्या सामन्यासाठी इशान किशनला संघातून वगळले जाणार आहे. दुसऱ्या सामन्यात इतकी चांगली खेळी खेळूनही त्याने संघाबाहेर बसावं अशी मागणी का केली जात आहे.

IND vs ZIM: दुसऱ्या मॅचमध्ये 81 धावा केल्या अन् तिसऱ्या सामन्यात संघातून बाहेर होणार, इशान किशनसोबत असा अन्याय का?
| Updated on: Jul 26, 2026 | 2:50 PM
Share

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरू असलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता एक उर्वरित सामना राहिला आहे जो आज खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी हरारे येथे खेळला जाईल. आता कालच्या सामन्यात भारतीय संघातून केवळ इशान किशनला जास्त धावा करता आल्या. इशानने 81 धावा केल्या. तरीही आता इशानलाच संघातून बाहेर काढा असं म्हटलं जात आहे. धावा करुनही इशानने संघाच्या बाहेर का बसावं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर इशान प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर जावं अशी मागणी माजी क्रिकेटर का करत आहे यामागचे कारणही त्यांनी आता बोलून दाखवले आहे.

या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी, भारताचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या मते, संघ व्यवस्थापनाने प्रभसिमरन सिंगला संधी देण्याची वेळ आली आहे. आकाश चोप्रा यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेषतः इशान किशनचा उल्लेख करत ते म्हणाले की, भारताने मालिका आधीच जिंकल्यामुळे या अंतिम सामन्यासाठी इशान किशनला विश्रांती दिली पाहिजे. त्याऐवजी, पंजाब किंग्सचा स्फोटक यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंगला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान दिले पाहिजे. चोप्रा म्हणाले, “मी सुद्धा प्रभसिमरनला खेळवण्याचा विचार करत आहे. त्याचा दोष काय आहे? तुम्ही प्रभसिमरनला संघात निवडले आहे, पण तुम्ही त्याला दुसरी संधी कधी द्याल याची आम्हाला कल्पना नाही. तुम्ही मालिका आधीच जिंकली आहे.”

आकाश चोप्राने स्पष्ट केले की, “प्रभसिमरन शर्माला संघात स्थान देण्यासाठी अभिषेक शर्माला संघातून वगळू नये. अभिषेक पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे, पण चोप्राची इच्छा आहे की संघाने त्याच्यावर विश्वास दाखवावा. ते म्हणाले, “अभिषेकच्या जागी प्रभसिमरनला खेळवू नका. त्याला ईशानच्या जागी संधी द्या. जरी अभिषेकने धावा केल्या नसल्या आणि त्याचे दोन सामने खराब गेले असले तरी, त्याला तिसऱ्या सामन्यातही खेळवा. त्याच्याकडून धावा करून घ्या आणि गोलंदाजीची गरज भासल्यास तीही त्याच्याकडून करून घ्या.”

प्रभसिमरन सिंगने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधील त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे. त्याने 127 टी-20 डावांमध्ये 151.50 च्या स्ट्राइक रेटने एकूण 3,665 धावा केल्या आहेत. चोप्रा यांनी शेवटी म्हटले, “ईशानला थोडा आराम द्या. प्रभसिमरन यष्टीरक्षणाची जबाबदारीही सहजपणे सांभाळेल. त्यामुळे तुम्ही त्याचा एक खेळाडू म्हणूनही उपयोग करू शकता. प्रभसिमरनला संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे.”

Follow Us
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला थेट अटक, नेमकं काय घडलं?
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला,
ठाकरेंच्या सभेत बोलक्या बाहुल्याचाही सरकावर वर हल्लाबोल; थेट म्हणाला, धुरंधर 3 मध्ये पंतप्रधान...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच...
खड्डामंत्री म्हणत मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, एकाच शब्दाने उडवली खळबळ
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री फडणवसीचं स्पष्टीकरण
दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसीचं स्पष्टीकरण, म्हणाले...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी...
सर्वात मोठी अपडेट! धर्मेद्र प्रधानांनी राजीनामा देताच प्रल्हाद जोशी शिक्षण मंत्री
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या
एकीकडे ठाकरे बंधूंची सभा, तर दुसरीकडे संजय शिरसाट थेट अभिजीत दीपकेच्या घरी, राज्याच्या राजकारणात मोठं घडतंय?
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
महाराष्ट्र आणि दिल्ली पोलिसांमधला फरक जगाला कळला; राज ठाकरेंचा टोला
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत ठाकरे
पेपरफुटीचे फायदे सांगणाऱ्या.... निर्मला सीतारमण यांच्याबाबत उद्धव ठाकरे हे काय म्हणाले?
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंचं भाषण...
ही जनतेच्या आंदोलनाची ताकद, अखेर सरकारला नमवलं; राज ठाकरेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची गर्दी
Thackeray Sabha Video | एकाहुन एक पोस्टर अन् मिम्स, ठाकरेंच्या विजय सभेसाठी समर्थकांची मोठी गर्दी