जहालमतवादी ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात सहभाग,शेर ए पंजाब लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचं कार्य

जहालमतवादी ते महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात सहभाग,शेर ए पंजाब लाला लजपत राय यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचं कार्य
Lala Lajpat Rai

लाला लजतप राय (Lala Lajpat Rai ) याचं देखील स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला स्मरण आणि त्यांना अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 28, 2022 | 8:25 AM

नवी दिल्ली : भारत सध्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशाला पारतंत्र्यांच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या पूर्वजांना आणि त्यांचा कार्याला अभिवादन करणं ही आपली जबाबदारी आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात (Indian Freedom Struggle) जहालमतवादी ते महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनातील एक प्रमुख नेते असा प्रवास राहिलेल्या लाला लजतप राय (Lala Lajpat Rai ) याचं देखील स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला स्मरण आणि त्यांना अभिवादन करणं आपलं कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नाव म्हणजे लाला लजपत राय होय. लाला लजपत रॉय यांची आज जयंती आहे. लाला लजपत राय यांना शेर ए पंजाब आणि पंजाब केसरी (Punjab Kesari) या नावानं ओळखलं जातं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहालवादी गटाची ओळख लाल-बाल-पाल अशी होती. त्यामध्ये लाला लजपत राय यांचा समावेश होता. लाला लजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1865 ला झाला होता. लाला लजपत राय यांची ओळख वकील, आर्यसमाजी आणि कष्टकऱ्यांचं आंतराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणारे आणि पंजाब नॅशनल बँकेचे संस्थापक अशी ओळख आहे. हिंदी-उर्दू-पंजाबीला प्रोत्साहन देण्याचं काम देखील लाला लजपत राय यांनी केलं होतं.

सायमन कमिशनला विरोध

लाला लजपत राय यांना इंग्रजांचा विरोध केला म्हणून म्यानमारच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. तिथून ते अमेरिकेला गेले आणि भारतात परत आले. देशात परतल्यावर लाला लजपत राय महात्मा गांधी यांच्या असहकर चळवळीचा भाग बनले होते. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं होतं. भारतातील कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी सायमन कमिशन आलं होतं. मात्र, सायमन कमिशनमध्ये कोणताही भारतीय नसल्यानं विरोध सुरु झाला होता.

साँडर्सचा लाठीमार, लाला लजपत राय यांचं निधन आणि देशभर संताप

सायमन कमिशनला ठिकठिकाणी विरोध सुरु झाला होता. मुंबईत सायमन कमिशन पोहोचल्यावर सायमन गो बॅकचे नारे लावण्यात आले होते. तर. पंजाबमध्ये सायमन कमिशनच्या विरोधाचं नेतृत्त्व लाला लजपत राय यांनीकेलं होतं. कमिशनला लाहोरमध्ये पोहोचताच काळे झेंडे दाखवले गेले. साँडर्सनं विरोधातील आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीमार केला. लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लाला लजपत राय 18 दिवस रुग्णालयात दाखल होते. अखेर 17 नोव्हेंबर 1928 ला त्यांचं निधन झालं. लाला लजपत राय यांचं साँडर्स यानं केलेल्या लाठीमारात जखमी झाल्यानं न निधन झालं होतं. लाला लजपत राय यांच्या निधनानं देशभर संतापाचं वातावरण निर्माण झालं. ‘मेरे शरीर पर पड़ी एक-एक लाठी ब्रिटिश सरकार के ताबूत में एक-एक कील का काम करेगी.’ लाला लजपत राय यांचे हे शब्द भारतीय स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरले.

लाला लजपत राय यांच्या निधनानं भारतीयांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं होतं. या असंतोषातूनचं पुढं शहीद भगतसिंह आणि इतर सहकाऱ्यांनी लाला लजपतराय यांच्यावरील लाठीमाराचा बदला घेतला. लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला साँडर्सला गोळ्या झाडून घेण्यात आला.

इतर बातम्या:

Video: बुलडाण्यात भीषण अपघात, कारच्या धडकेत मुलगा रस्त्यावरुन उडाला, जगण्याशी झूंज

MPSC Exam : एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, गट ब मुख्य परीक्षा न्यायालयीन कारणांमुळे लांबणीवर

Punjab Kesari Lala lajpat rai birth anniversary know his contribution in Indian Freedom Struggle

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें