AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super 75 Scholarship : बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणासह व्यवसायासाठी 5 लाख रुपये मिळणार, जाणून घ्या या शिष्यवृत्तीचे फायदे

जम्मू-काश्मीर सरकारने राज्यातील गुणवंत मुलींसाठी सुपर 75 शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. या शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे 5 लाख 89 हजार विद्यार्थीनींना लाभ मिळणार आहे. (Rs 5 lakh for business with free education to girls up to class XII, know the benefits of this scholarship)

Super 75 Scholarship : बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणासह व्यवसायासाठी 5 लाख रुपये मिळणार, जाणून घ्या या शिष्यवृत्तीचे फायदे
बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षणासह व्यवसायासाठी 5 लाख रुपये मिळणार
| Updated on: Mar 16, 2021 | 7:48 PM
Share

नवी दिल्ली : मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि दुर्गम भागातील मुलींपर्यंतही शिक्षण पोहचवता यावे यासाठी सुपर शिष्यवृत्ती योजना आणल्या आहेत. शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आली आहे. जम्मू-काश्मीर सरकारने राज्यातील गुणवंत मुलींसाठी सुपर 75 शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत. या शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत राज्यातील सुमारे 5 लाख 89 हजार विद्यार्थीनींना लाभ मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मुलींसाठी मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. (Rs 5 lakh for business with free education to girls up to class XII, know the benefits of this scholarship)

जम्मू-काश्मीर सरकारने जाहीर केलेल्या या शिष्यवृत्तीमध्ये (सुपर 75 शिष्यवृत्ती) मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी काम केले आहे. या शिष्यवृत्तीमध्ये सहभागी झालेल्या मुलींना पहिली ते बारावीपर्यंत शासकीय शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळेल. मुलींनी एखादा व्यवसाय सुरू केल्यास या शिष्यवृत्तीमध्ये तेजस्विनी योजना अंतर्गत त्यांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. ही योजना ‘मिशन यूथ-जे व के’ अंतर्गत सुरू केली गेली आहे.

Super 75 Scholarship चे लाभ

जम्मू-काश्मीरमध्ये मुलींना चांगले शिक्षणासोबत आर्थिक मदत पुरवणााऱ्या या शिष्यवृत्ती योजनेत सुमारे 5 लाख 89 हजार विद्यार्थीनींना जोडले जाईल. या योजनेत सामील झालेल्या मुलींना शासकीय शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण मिळेल. शालेय शिक्षणाबरोबरच पुस्तके, प्रती आणि सॅनिटरी पॅड यासारख्या आवश्यक वस्तूदेखील पुरविल्या जातील. तेजस्विनी अंतर्गत 18 ते 35 वर्षे वयोगटातील मुलींना स्वत: चा व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. यामध्ये मिशन युवा अंतर्गत 10 टक्के खर्च देण्यात येणार असून व्याजातही सूट देण्यात येणार आहे.

काय आहे तेजस्विनी योजना?

या सुपर 75 शिष्यवृत्तीला तेजस्विनी योजनेशी जोडून मुलींच्या हिताचे काम केले जात आहे. तेजस्विनी योजनेचा उद्देश 14 ते 24 वर्षांच्या मुलींना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करणे आहे. महिला, बालविकास आणि सामाजिक सुरक्षा विभाग संचलित ही योजना झारखंड राज्यातही राबविण्यात आली आहे. येथे तेजस्विनी क्लब आणि आठ तेजस्विनी क्लब मिळून एख तेजस्विनी केंद्र बनवले आहे. यामध्ये राज्यातील 14 ते 24 वर्षे वयोगटातील मुलींना जोडण्याचे काम केले जात आहे.

उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली माहिती

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एमए रोडवरील महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात या योजनेची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, राज्यातील 88 कस्तुरबा गांधी विद्यालय आणि 88 मुलींची वसतिगृहे राज्यातील दुर्गम भागात शिक्षणासाठी प्रोत्साहन देत आहोत. तसेच राज्यात 13 शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (Rs 5 lakh for business with free education to girls up to class XII, know the benefits of this scholarship)

इतर बातम्या

वसतिगृहांना ‘मातोश्री’ नाव, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

साडेतीन कोटींची थकबाकी, 28 वर्षांचा कर, मुंबई महापालिका नडताच झटक्यात पैसे दिले

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.