AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळांचं ठरलं,महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय कधी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार, उदय सामंतांची माहिती

पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

शाळांचं ठरलं,महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय कधी? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेणार,  उदय सामंतांची माहिती
उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 5:28 PM
Share

पुणे : महाराष्ट्रातील शाळा सुरु करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. आता 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होतील अशी माहिती आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील महाविद्यालयं कधी सुरु होणार यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर बोलताना उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आली आहे. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार

राज्यातील महाविद्यालयं सुरु करण्यासंदर्भात सगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंकडून अहवाल मागवला आहे. महाविद्यालय कधी सुरु करायची याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. महाविद्यालय सुरु करण्याची वेळ आलेली आहे. दिवाळीनंतर महाविद्यालय सुरू करण्याचा विचार असल्याचं उदय सामंत महणाले आहेत.

राणेंना मंत्रिपद मिळाल्यानं शिवसेना संपणार नाही

नारायण राणेंना मंत्रीपद दिलं म्हणून कोकणातली शिवसेना संपणार नाही उलट जोमानं उभी राहणार आहे. माझ्या मतदारसंघात पंचायत समिती ,जिल्हा परिषद, नगरपालिका आमच्या ताब्यात आहे. ठाकरे सरकार कधीही कोसळणार ? हे वक्तव्य राणेंनी कोणाच्या जोरावर केलं ?, असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे. शिवसेनेला शह कोणीच देऊ शकत नाही. राणेंना मंत्रीपद मिळालं तरी मुंबई महापालिका ही शिवसेनेचीच असेल. भगवा फडकेल आणि महापौर शिवसेनेचाच होईल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीत सगळे एकत्र बसून निर्णय

महाविकास आघाडीत सगळे एकत्र बसून निर्णय घेतात, त्यामुळे कोणाची नाराजी असण्याचं काही कारण नाही. काही ठिकाणी स्थानिक मतभेद असतील मात्र त्याचा परिणाम हा आघाडीवर होणार नाही. मी यावर बोलणं उचित नाही, असंही उदय सामंत म्हणाले.

शाळा 4 ऑक्टोबरला सुरु होणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता, 4 ऑक्टोबरपासून कोरोना नियमांचं पालन करुन शाळा सुरु होतील. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यानं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.

राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी कोरोनाचे नियमांचं पालन करुन शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीपासून शाळा बंद होत्या. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्यानं शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी लसीकरण झालं आहे. शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांचं लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra School Reopen: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला मान्यता, ‘या’ दिवशी शाळा सुरु

Varsha Gaikwad : ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु होणार : वर्षा गायकवाड

Uday Samant Said College reopen decision will be take Uddhav Thackeray

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.