AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kerala Election 2021: राहुल गांधी, केवळ मुलींच्याच कॉलेजात जातात… माजी खासदाराची जीभ घसरली

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. (Former MP Joyce George makes derogatory comment against Rahul Gandhi...)

Kerala Election 2021: राहुल गांधी, केवळ मुलींच्याच कॉलेजात जातात... माजी खासदाराची जीभ घसरली
Former MP Joyce George
| Updated on: Mar 30, 2021 | 10:55 AM
Share

इडुक्की: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. अशावेळी सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी होत आहे. परंतु, काही नेत्यांनी या निवडणुकीत ताळतंत्र सोडल्याचं दिसून येत आहे. केरळमधील माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी एका रॅलीला संबोधित करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे काँग्रेसचा पारा चढला असून त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे जॉर्ज यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. (Former MP Joyce George makes derogatory comment against Rahul Gandhi…)

इडुक्की जिल्ह्यातील केरळ सरकारचे मंत्री एम. एम. मणी यांच्या रॅलीला संबोधित करताना जॉयस जॉर्ज यांची जीभ घसरली. ते म्हणाले की, केवळ मुलींच्याच कॉलेजात जायचं. तिथे जाऊन मुलींना बेंड कसं व्हायचं हे शिकवायचं हाच राहुल गांधी यांचा निवडणूक प्रचार आहे. मी मुलींना सांगतो, असं करू नका. राहुल गांधींसमोर ताठ उभ्या राहा.

विवाहित नाहीत म्हणून…

एवढेच नाही तर जॉर्ज यांनी पुढे तर आणखी कहर केला. राहुल गांधी विवाहित नाहीत. त्यामुळेच ते अशा प्रकारच्या कार्यक्रमात जात असतात, अशी बेलगाम वक्तव्यही त्यांनी केली. जॉर्ज जेव्हा अत्यंत खालच्या भाषेत बोलत होते, तेव्हा एम. एम. मणी हे स्टेजवर होते आणि ते खो खो हसून त्यांना दाद देत होते. या प्रकारामुळे काँग्रेसचा पारा चढला आहे. काँग्रेस पक्षाने या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला असून जॉर्ज यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. जॉर्ज हे इडुक्कीमधून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले होते.

6 एप्रिलला मतदान

दरम्यान, केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून राज्यात येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल येत्या 2 मे रोजी लागणार आहे. निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी अवघे थोडेच दिवस शिल्लक असतानाच राजकीय नेत्यांनी तोंडाच्या वाफा सोडायला सुरुवात केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. (Former MP Joyce George makes derogatory comment against Rahul Gandhi…)

संबंधित बातम्या:

Tamilnadu Election 2021: अण्णाद्रमुकच्या आमदाराच्या ड्रायव्हरच्या घरावर छापा; एक कोटी रुपये जप्त

नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी एकही जागा मिळणार नाही, त्यांनी वेळ वाया घालवू नये,काँग्रेस नेत्याचा टोला

Kerala Election 2021 : तिकीट मिळालं नाही, काँग्रेस महिला मोर्चाच्या अध्यक्षाचं मुंडण, राजीनामाही सादर!

(Former MP Joyce George makes derogatory comment against Rahul Gandhi…)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.