Assam Election 2021: राहुल गांधी आसाममध्ये पर्यटकासारखे; अमित शहांचा टोला

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (Freed Assam from terrorism, ensured development: Amit Shah)

Assam Election 2021: राहुल गांधी आसाममध्ये पर्यटकासारखे; अमित शहांचा टोला
amit shah

गुवाहाटी: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी हे आसाममध्ये पर्यटकांसारखे आले आहेत, असा टोला अमित शहा यांनी लगावला आहे. (Freed Assam from terrorism, ensured development: Amit Shah)

चिरांग येथे आयोजित एका प्रचार सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी पर्यटक म्हणून आसाममध्ये आले आहेत. बदरुद्दीन अजमल हेच आसामचा चेहरा असल्याचं ते सांगत आहेत. तुम्हीच सांगा, अजमल आसामची ओळख आहेत की भूमेन हाजारिका, उपेंद्र नाथ आणि शंकर देव आहेत? ब्लॅक माऊंटेन अजमल हे आसामची ओळख असूच शकत नाही, असं शहा यांनी सांगितलं.

घुसखोरांचा अड्डा होऊ देणार नाही

काजीरंगा जंगलात प्राण्यांची शिकार केली जात होती. घुसखोरांकडून ही शिकार केली जायची. आम्ही या घुसखोरांना हुसकावून लावलं आणि प्राण्यांची शिकार थांबवली, असं ते म्हणाले. सरकारची चावी माझ्या हातात आहे असं काल बद्रुद्दीन अजमल म्हणाले. माझ्या मनात येईल तसं सरकार चालवेल. ज्याला हवं त्याला मंत्री करेल असं ते म्हणाले. मी म्हणतो सरकारची चावी तुमच्या हाती नाही, तर आसामच्या जनतेच्या हातात आहे. एक लक्षात ठेवा, आसामला आम्ही घुसखोरांचा अड्डा कदापि बनवू देणार नाही, या घुसखोरांना आम्ही हुसकावून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आश्वासने पूर्ण केली

यावेळी शहा यांनी आसामी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचं सांगितलं. पाच वर्षांपूर्वी आसाममध्ये आलो तेव्हा तुम्हाला आश्वासन दिलं होतं. आम्ही आसामला दहशतवाद मुक्त करू असं आश्वासन दिलं होतं. आम्ही हे आश्वासन पूर्ण केलं आहे. आम्ही आंदोलन मुक्त आसामही केला आहे. आता तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही आसामचा विकास करून दाखवू, असं शहा म्हणाले.

उद्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान

आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यात 47 जागांसाठी मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी 1 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तसेच तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 40 जागांसाठी येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहे. (Freed Assam from terrorism, ensured development: Amit Shah)

 

संबंधित बातम्या:

429 गाड्या, 268 कोटींची संपत्ती, आसामच्या रणसंग्रामातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

Bengal-Assam Election voting : पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये 79.79 टक्के, तर आसाममध्ये 72.14 टक्के मतदान

West Bengal Assam Opinion Poll LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीं बहुमताजवळ,आसाममध्ये भाजप पुन्हा

(Freed Assam from terrorism, ensured development: Amit Shah)