AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goa Assembly Elections 2022 : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, गोव्यात आपचं भंडारी कार्ड चालणार?

Aam Aadami Party in Goa : जपला कोंडीत पकडण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी देऊ अशी घोषणा आधीच केली होती. त्यानुसार त्यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अमित पालेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे.

Goa Assembly Elections 2022 : अमित पालेकर आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, गोव्यात आपचं भंडारी कार्ड चालणार?
Amit Palekar
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 12:51 PM
Share

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी अखेर गोव्यातील आपच्या (Aam Aadami Party Goa) मुख्यमंत्रिपदाच्या आपला चेहरा कोण असणार, याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रिपदासाठी देऊ अशी घोषणा आधीच केली होती. त्यानुसार त्यांनी अखेर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अमित पालेकर (Amit Palekar) यांच्या नावाची घोषणा केली आहे. आपनं अमित पालेकर यांना सांताक्रूझ मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. पणजीला खेटूनच असलेल्या या मतदारसंघातून अमित पालेकर आपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. भंडारी समाजाच्या मनात अन्यायाची भावना गेली अनेक वर्ष सत्ताधारी पक्षांविरोधात आहे. या समाजाला न्याय देण्यासाठी आपण जातीचं राजकारण करत नसून अन्याय दूर करण्यासाठी भंडारी समाजाचा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून देत आहोत, असं अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलंय.

कोण आहेत अमित पालेकर?

अमित पालेकर यांना घरातूनच राजकारणाचं बाळकडू मिळाले आहे. त्यांची आई माजी सरपंच होत्या. त्यामुळे त्यांनी राजकारण जवळून अनुभवलेलं आहे. अशातच आता गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ते स्वतः राजकारणात सक्रिय आहे. आपमध्ये प्रवेश केल्यानंतर अमित पालेकर हा एक आपचा एक आक्रमक चेहरा म्हणून गोव्यातून समोर आले आहोत. सध्या राजकीय रिंगणात उतरलेले अमित पालेकर हे भंडारी समाजातील असून एक युवा राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे ते एक गोव्यातील आघाडीचे वकीलही आहे. त्यांनी काही काळ पत्रकार म्हणून काम केल्याचंही स्थानिक पत्रकारांनी म्हटलंय. अत्यंत हुशार, हजरजबाबी म्हणून अमित पालेकर ओळखले जातात. भंडारी समाजातील आघाडीचे वकील असलेल्या अमित पालेकर यांचं अनेक भाषांवर प्रभुत्वही आहे.

पण निवडून येणं कठीण?

गोव्यात भंडारी मतदार हा एक महत्त्वाचा गट आहे. हेच हेरुन अरविंद केजरीवाल यांनी ही राजकीय खेळी केली असल्याचा टोला विरोधकांनी लावला होता. ओबीसींमधील साठ टक्के मतदार हे भंडारी असल्याची माहिती स्थानिक पत्रकारांनी दिली असून त्याचा फायदा येत्या निवडणुकीत ‘आप’ला होतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. भंडारी चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी जरी दिला असला, तरिही ज्या मतदारसंघातून अमित पालेकर निवडणूक लढवण्यासाठी रिंगणात उतरले आहेत, तो मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. सध्या रुदॉल्फ फर्नांडिस यांचं तगडं आव्हान अमित पालेकरांना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीआधी पार पार करुन दाखवावं लागणार आहे.

मतदारसंघाचा इतिहास

सांताक्रूझ हा गोव्याच्या उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. या मतदार संघामध्ये सहावेळा काँग्रेसची सत्ता होती. 2017 मध्ये काँग्रेसच्या अँटोनियो फर्नांडिस यांनी विजय मिळवला होता. 1994 साली या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार व्हिक्टोरीया फर्नांडिस रोमियो यांनी निवडणूक जिंकली होती. 1999मध्ये गोमंतक लोक पार्टीतून काँग्रेसमध्ये आलेल्या व्हिक्टोरीया यांनी सांताक्रूझमधूनच निवडणूक जिंकली होती. 2002मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर दुसऱ्यांना आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम केला होता. तर 2007 सालीही त्यांनी पुन्हा ही किमया करुन दाखवली होती. सांताक्रूझ विधानसभा मतदारसंघात 2017 साली 27711 इतके मतदार होते, ज्यापैकी 22215 जणांनी मतदान केलं होतं.

संबंधित बातम्या :

VIDEO: उत्पल पर्रिकरांना तिकीट देणं यांच्या हातात नाही, हे तर बोलघेवडे; राऊतांचा चंद्रकांतदादांवर हल्लाबोल

VIDEO: फडणवीसांना गोव्याची हवा लागली, त्यांचं अध:पतन झालंय; संजय राऊतांची खोचक टीका

Goa Assembly Election 2022 | नेते महाराष्ट्रातले, स्पर्धा गोव्याची! जुगलबंदी रंगली फडणवीस विरुद्ध राऊत वक्तव्यांची

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.