AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gujrat Assembly Election | नरेंद्र मोदी यांचं होम ग्राऊंड, 27 वर्षांची भाजपची सत्ता, गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज!

Gujrat Assembly election 2022 result | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेल्या गुजरात विधानसभा निवडणूक निकालाकडे आज संपूर्ण देशाचं लक्ष आहे.

Gujrat Assembly Election | नरेंद्र मोदी यांचं होम ग्राऊंड, 27 वर्षांची भाजपची सत्ता, गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज!
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Dec 08, 2022 | 7:00 AM
Share

नवी दिल्लीः मागील 27 वर्षांपासून भाजपची सत्ता असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल (Gujrat Assembly Election) आज लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं होमग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदा प्रथमच आप, काँग्रेस (Congress) आणि भाजप अशी तिहेरी लढत पहायला मिळतेय. राज्यातील एकूण 182 जागांच्या विधानसभेसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडलं. आज 8 डिसेंबर रोजी सकाळीच मतमोजणीला सुरुवात होत आहे.

काल दिल्ली महानगर पालिका निवडणुकीत भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून दिल्यानंतर गुजरातमध्ये आम आदमी पार्टी काय परिणाम दाखवते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात गुजरात विधानसभेसाठी मतदान पार पडलं. आज 37 मतदान केंद्रांवरून मतमोजणीला सुरुवात होत आहे.

एक्झिट पोल्सच्या अंदाजांनुसार, आपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरीही भाजप या निवडणुकीत विजयी होणार आहे. असे झाल्यास भाजप सलग सातव्या वेळी गुजरातमध्ये सरकार स्थापन करेल.

गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी ही निवडणूक लढवली गेली. बहुमतासाठी 92 ही मॅजिक फिगर असणार आहे. सत्ताधारी भाजपाला 117 ते 151जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

भाजपने अनेक महत्त्वाचे नेते, केंद्रीय मंत्री यांसह विविध राज्यांतील मातब्बर नेते प्रचारासाठी गुजरातमध्ये उतरवले होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तब्बल 35 सभा घेतल्या. तर आम आदमी पार्टीनेही तगडा प्रचार केला.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार इसुदान गढवी, तरुण नेते हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी आणि अल्पेश ठाकूर यांच्या मतदार संघातील लढतीकडे देशाचं लक्ष लागलंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीत एकूण 70 पक्षांनी सहभाग घेतला असून 624 अपक्षांनी नशीब आजमावलं आहे. या निवडणुकीत एकूण 1,621 उमेदवारांचे भवितव्य ठरेल.

2017 विधानसभा निवडणुकीचा निकाल काय?

भाजपा – 99

काँग्रेस – 77

अपक्ष – 3

भारतीय ट्रायबल पार्टी – 2

राष्ट्रवादी काँग्रेस – 1

आपची एंट्री, भाजपासाठी धोक्याची घंटी?

यंदा प्रथमच गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने उमेदवार दिले आहेत. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार, यंदाही निवडणुकीत भाजपाचा एकतर्फी विजय होणार आहे. मात्र आपच्या एंट्रीमुळे भाजपच्या मतांवर परिणाम होण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला 49.44 टक्के मतं मिळाली होती. मात्र काही अंदाजांनुसार, यंदा भाजपाला 46 टक्के मतं मिळू शकतात. हा फरक यंदाच्या विधानसभेत लहान वाटत असला तरीही आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. त्यामुळे आजच्या निकालांकडे देशाचं लक्ष लागलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.