AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक 2024: मतदान कार्ड नाही, मग मतदानासाठी जाताना काय असणार पर्याय

lok sabha election 2024 phase 1 polls: लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उद्या शुक्रवारी मतदार बाहेर पडणार आहेत. मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा तत्सम पुरावा सोबत नेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही.

लोकसभा निवडणूक 2024: मतदान कार्ड नाही, मग मतदानासाठी जाताना काय असणार पर्याय
voter id card
| Updated on: Apr 26, 2024 | 7:46 AM
Share

लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदानाचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी होत आहे. देशातील १०२ लोकसभा मतदार संघात उद्या मतदान होणार आहे. त्यात विदर्भातील पाच मतदार संघ आहेत. केंद्रीय मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्या नागपूर लोकसभा मतदार संघासह रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूरमध्ये मतदान होणार आहे. प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण तयारी झाली आहे. मतदान साहित्याचे वाटप आज करण्यात आले आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उद्या शुक्रवारी मतदार बाहेर पडणार आहेत. मतदानासाठी जाताना मतदार ओळखपत्र किंवा तत्सम पुरावा सोबत नेणे आवश्यक आहे. कोणकोणती ओळखपत्र मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार, जाणून घ्या…

मतदान ओळखपत्र नसल्यास काय असतो पर्याय

मतदान ओळखपत्र नसल्यास अनेक पर्याय निवडणूक आयोगाने दिले आहेत. हे पुरावे सोबत नेल्यानंतर मतदान करता येणार नाही. यामुळे तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसल्यास खालील पर्यायाचा वापर करावा.

मतदानासाठी आवश्यक पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणारे ओळखपत्र

  1. मतदान कार्ड
  2. पासपोर्ट (पारपत्र)
  3. वाहन चालक परवाना – Driving Licence
  4. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)
  5. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक
  6. पॅनकार्ड (PAN card)
  7. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
  8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  9. मनरेगा जॉबकार्ड
  10. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  11. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
  12. आधारकार्ड (Aadhar)

मतदान केंद्र कसे शोधावे

  • मतदान केंद्र शोधण्यासाठी निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in या वेबसाइटला भेट द्या. त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मतदान केंद्राचे नाव दिसेल.
  • तुमच्या मोबाईलवर व्होटर हेल्पलाइन ॲप (Android साठी) आणि व्होटर हेल्पलाइन ॲप (iOS साठी) डाउनलोड करू शकता.
  • मतदारांसाठी हेल्पलाईन सुविधा दिली आहे. त्यासाठी 1950 या क्रमांकावर कॉल करा. नंबर डायल करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड माहिती असणे आवश्यक आहे.
  • तुमचे मतदान ठिकाण शोधण्यासाठी तुम्ही 1950 वर एसएमएस पाठवू शकता.
Follow Us
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.