AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या पक्षाचा कॉंग्रेसला टाटा, बाय बाय…, इंडिया आघाडीला पहिला जोर का झटका

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर इंडिया आघाडीतील एका बड्या पक्षाने काँग्रेससोबत असलेली आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापनेची तयारी करत असलेल्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर तिसऱ्याच दिवशी इंडिया आघाडातील एक पक्ष फुटला आहे.

बड्या पक्षाचा कॉंग्रेसला टाटा, बाय बाय..., इंडिया आघाडीला पहिला जोर का झटका
RAHUL GANDHI AND ARVIND KEJRIWALImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 06, 2024 | 8:45 PM
Share

लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्षाचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली. दिल्लीच्या सात जागांपैकी आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागा लढविल्या होत्या. मात्र, येथील सातही जागांवर भाजप उमेदवार निवडून आले. या मोठ्या अपयशानंतर लोकसभा निवडणुक निकालाच्या तिसऱ्याच दिवशी ‘आप’ने काँग्रेसला टाटा, बाय बाय करत एकट्यानेच पुढे जाण्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची जाहीर घोषणा केली.

दिल्लीतील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अर्विनाद केजरीवाल यांच्या घरी पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पक्षांचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी आपल्या पक्षाने विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेससोबतची युती ही केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे. लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे एकत्र लढलो. पण, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमची युती नाही. दिल्लीच्या जनतेसोबत मिळून आम्ही ही लढाई लढू आणि जिंकू. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट झाले आहे की लोकसभा निवडणुकीसाठी भारत आघाडीची स्थापना झाली होती. त्यामुळे आम्ही एकत्र लढलो. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही युती झालेली नाही. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे, असे ते म्हणाले.

केजरीवाल यांनी आधीच संकेत दिले होते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जूनपर्यंत कोर्टाने जामीन दिला होता. पण, पुन्हा तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससोबतची मैत्री भविष्यात संपुष्टात येऊ शकते, असे संकेत दिले होते. काँग्रेससोबत आमचा कोणताही कायमचा विवाह नाही. आमचे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजही नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला पक्ष महाआघाडीत सामील झाला होता असे ते म्हणाले होते.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...