एकमेकांचे सगेसोयरे पण पक्ष वेगवेगळे, पाहा नगरला का म्हणतात राजकीय गणगोतांचा जिल्हा

दरवेळेस प्रमाणे यंदाही नगरमध्ये सगेसोयऱ्यांचीच चर्चा आहे. कारण नगरमधलं राजकारण जरा वेगळं आहे. नगरमधील या राजकारणाने राजकीय गणितं देखील बदलतात. पण याचा फायदा यंदा कोणाला होणार आहे जाणून घेऊयात.

एकमेकांचे सगेसोयरे पण पक्ष वेगवेगळे, पाहा नगरला का म्हणतात राजकीय गणगोतांचा जिल्हा
nagar loksabha
Follow us
| Updated on: Apr 06, 2024 | 9:30 PM

Loksabha election : नगरचं राजकारण हे सगेसोऱ्यांचं राजकारण म्हणून ओळखलं जातं. या गणगोताची नगर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होते आहे. राज्यातली समीकरणं बदलली. त्याचप्रमाणे सगेसोयऱ्यांचीही गणितं बदलणार का. कोणताही काना-मात्र नसलेला नगर जिल्हा राजकीय गणगोतांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. सहकाराची पंढरी आणि सगेसोयऱ्यांमुळे पक्षीय भूमिकेऐवजी आपापसातील सहकार म्हणूनही नगरचं राजकारण चर्चेत राहतं. त्यामुळे यंदाही नगरमध्ये सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चांगलीच चर्चा आहे. राजकारणात नगरच्या सगेसोयऱ्यांच्या नात्यांचं जाळं जास्तकरुन नगर शहर, राहुरी, नेवासा,शेवगाव, पाथर्डी, संगमनेर आणि कोपरगावात विस्तारलं आहे. नगरमधले नेते., राजकीय पक्ष आणि गणगोत नेमकं कसं आहे जाणून घेऊयात.

कोण-कोणाचे सगेसोयरे

संगमनेरचे बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांच्या भगिणी पार्थर्डीचे भाजप नेते आप्पासाहेब राजळे यांना दिली आहे. राजळेंच्या सून मोनिका राजळे आधी राष्ट्रवादीत होत्या, आता भाजपच्या आमदार आहेत. आप्पासाहेब राजळेंची कन्या नेवासात ठाकरे गटाच्या शंकराराव गडाखांना दिली आहे.

शेवगाव-पाथर्डीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यांचे बंधू नरेंद्र गोले शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. घुलेंची एक कन्या नेवासातल्या ठाकरे गटाच्या गडाखांची सून आहे. आणि घुलेंच्या दुसऱ्या कन्या कोपरगावचे अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळेंच्या पत्नी आहेत.

राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले भाजपात आहेत. त्यांची एक मुलगी नगरच्या संग्राम जगतापांना दिली आहे, जे सध्या अजित पवार गटात आहेत. दुसरी मुलगी नगरच्या कोतकर घराण्यात आहे जे याआधी काँग्रेसमध्ये होते. आणि तिसरी नमुलगी नगरच्या गाडे परिवारात आहेत जे शरद पवारांच्या गटात आहेत.

म्हणून नगरच्या राजकारणात काय होईल, याचा अंदाज बऱ्याचदा चुकतात. वर-वर नातेसंबंध आणि राजकीय पक्ष वेगवेगळे वाटत असले., तरी आतून सगळे एकच आहेत अशी चर्चा नगरमध्ये नेहमी रंगत राहते. सगेसोयऱ्यांच्या गणितात सुजय विखे यंदा आघाडीवर आहेत. राजकीय समीकरण बदलल्यामुळे सगेसोयरेही एकत्र आल्याचं म्हणत बळ वाढल्याचा दावा शिवाजी कर्डिलेंनी व्यक्त केलाय.

२०१९ चे मतदान

यंदा भाजपच्या सुजय विखेंविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके लढणार आहेत. नगर लोकसभेत शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. 2019 ला भाजपच्या सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप लढले होते. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतदान झालं. विखे 2,81,474 मतांच्या फरकानं जिंकले.

नगर लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभांचं बलाबल पाहिल्यास श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते, शेवगावात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत. विखेंविरोधात गेली लोकसभा लढलेले अजित पवार गटाचे संग्राम जगताप नगर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात. तर कर्जतचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.