AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेठी लोकसभा निकाल 2024 : भाजपला मोठा धक्का, स्मृती ईराणी दणकून आपटल्या

Amethi Lok Sabha Election Result 2024 News in Marathi : अमेठी लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात 20 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडलं. अमेठी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. अमेठी मतदार संघ भारतातील गांधी कुटुंबाची कर्मभूमी आहे.

अमेठी लोकसभा निकाल 2024 :  भाजपला मोठा धक्का, स्मृती ईराणी दणकून आपटल्या
| Updated on: Jun 04, 2024 | 4:27 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा विजय समोर आला आहे. अमेठी येथून भापजच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या स्मृती ईराणी दणकून आपटल्या आहेत. ज्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात स्मृती ईराणी यांनी 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी अपयशाचा सामना करावा लागला आहे.  भारताच्या राजकारणात अमेठी (Amethi Election Result 2024 ) भागाला देखील महत्त्वाचं स्थान आहे. अमेठी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख शहर आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे.

1 जुलै 2010 रोजी बसपा सरकारने अधिकृतपणे अमेठी मतदारसंघ अस्तित्वात आणलं. सुरुवातीला याचे नाव छत्रपती साहुजी महाराज नगर होते, नंतर नाव बदलून अमेठी करण्यात आलं. अमेठी मतदार संघ भारतातील गांधी कुटुंबाची कर्मभूमी आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांचे नातू संजय गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे.

या मतदार संघात पहिली निवडणूक 1967 मध्ये झाली होती. ज्यामध्ये काँग्रेसच्या विद्या धर बाजपेयी या पहिल्या खासदार झाल्या. 1971 ते 1977 च्या निवडणुकीत जनता पक्षाचे रवींद्र प्रताप सिंह खासदार झाले. 1980 मध्ये संजय गांधी यांचा विजय झाला होता. पण विमान अपघातात संजय गांधी यांचं निधन झालं आणि 1981 मध्ये पुन्हा निवडणूक झाली, तेव्हा राजीव गांधी यांचा विजय झालं.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, त्यांचे नातू संजय गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी या प्रदेशाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 च्या निवडणुकीत राहुल गांधी येथून खासदार म्हणून निवडून आले होते परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या स्मृती ईराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा पराभव केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार अमेठीमध्ये 72.16 टक्के जनता शिक्षित आहे. ज्यामध्ये 83.85 टक्के पुरुष आणि 60.64 टक्के महिला आहेत. आता अमेठीमध्ये कोणाची सत्ता येणार पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2019 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)

2019 मध्ये भाजपच्या स्मृती ईराणी यांचा 4,68,514 मतांनी विजय झाला होता. तर काँग्रेसच्या राहुल गांधी यांना 4,13,394 लोकांनी मत दिलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3,940 लोकांनी नोटाला मत दिलं होतं.

2014 मधील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2019)

अमेठीमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती ईराणी यांचा पराभव झाला होता. तेव्हाकाँग्रेसच्या राहुल गांधी यांचा 4,08,651 मतांनी विजय झाला होता. तर भाजपच्या स्मृती ईराणी यांना 3,00,748 लोकांनी मत दिलं होतं.

निवडणूक निकालाशी संबंधित बातम्या वाचा :

लोकसभा निवडणूक निकाल 2024 LIVE मतमोजणी अपडेट्स

लोकसभा निकाल 2024 चे फुल कव्हरेज

लोकसभा मतदारसंघनिहाय निकाल 2024, एका क्लिकवर

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case :प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान