AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींशी मैत्रीपेक्षा शत्रुत्व परवडलं, ते संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवतात – सामनातून हल्लाबोल

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा शत्रुत्व केले तर ते फायद्याचं ठरतं. मोदा व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

मोदींशी मैत्रीपेक्षा शत्रुत्व परवडलं, ते संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवतात - सामनातून हल्लाबोल
मोदींवर सामनातून टीका
| Updated on: Jun 06, 2024 | 8:39 AM
Share

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर एनडीच पुन्हा सत्तेवर येणार हे स्पष्ट झालं असलं तरी भाजपच्या पिछेहाटीमुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची राज्यात आणि इंडिया आघाडीची देशात बऱ्यापैकी कामगिरी झाली असून विरोधी पक्ष बळकट होताना दिसत आहे. येत्या ८ जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील आणि एनडीएचं सरकार पुन्हा स्थापन होईल. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मोदी आणि भाजपावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. मोदी वगैरे लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा शत्रुत्व केले तर ते फायद्याचं ठरतं. मोदा व त्यांचा मतलबी पक्ष त्यांना संकटात साथ देणाऱ्या मित्रांनाच संपवून टाकतो, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे. त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहिले पाहिजे, असा इशाराही देण्यात आला आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात ?

सामनातून मोदी आणि भाजपवर बरीच टीका करण्यात आली आहे. भाजप हा मिठाला व शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी हे त्या बाबतीत प्रख्यात आहेत. मोदी यांचे भारतीय सभ्यता व संस्कृतीशी नाते नाही हे चंद्राबाबू वगैरे लोकांना माहीत आहेच, पण बाबू यांनीही राजकारणात अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे भारतीय सभ्यता व लोकशाहीला इजा पोहोचेल असे कृत्य ते करणार नाहीत. मोदी यांना ति सऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीशकुमार व चंद्राबाबूंचा वापर करतील, पण ही तिसरी ‘कसम’ म्हणजे मोदी -भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल. पडद्यामागची नवी पटकथा घडताना देश पाहत आहे.

नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्या इतपत साधे बहुमतही मिळालेले नाही . 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले व त्यांनी सांगि तले की , ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.’ चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की , ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला . मोदींना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही .

मोदींनी स्वतःचा पराभव मान्य केला

कारण त्यांच्या देवत्वाचा , अवतारगिरीचा व बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे. मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरका  बनवत नाहीत तर त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जा हीर करून स्वतःचा परा भव मान्य केला . ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी ’, ‘मोदी है तो मुमकी न है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली . मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबडय़ा घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही .

मोदींना यावेळी राम पावला नाही

मोदींच्या भाजपला 240 जागा मिळाल्याचे सांगितले जाते. या आकड्यातही घोळ आहे. एनडीए म्हणून 291 चा आकडा दाखवला जातोय तो फसवा आहे. त्यामुळे ति सऱ्यां दा शपथ घेण्यासाठी मोदी यांनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला तरी तो कागद व त्यावरील बहुमताचा आकडा म्हणजे त्यां च्या ‘एम.ए.’ इन एन्टायर पॉ लिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल.  मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबडय़ांवरचे बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावास मानवणारे नाही. म्हणूनच भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका , पण ‘सभ्यता’ व ‘संस्कृती ’ या दोन महान हिंदू शब्दांशी मोदी व शहा महा शयांचा संबंध आला नसावा म्हणून आता मोदींचे सरकार नाही , तर एनडीएचे सरकार बनवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाले तर मोदी यांना अनेक कुबडय़ांच्या अटी-शर्तींवर काम करावे लागेल. मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना यावेळी राम पावला नाही . का रण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. वाराणसीचा प्रचार संपताच मोदी यांनी 10 कॅमेऱ्यांसह ध्यान सुरू केले, पण वाराणसीत त्यांचे मताधिक्य जोरदार घसरले. हा देवाचा प्रसादच म्हणावा लागेल. भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या 240 जागा हा ‘मोदी ’ ब्रॅण्डचा चमत्कार नाही . राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजपने हा आकडा गाठला .

मो दी यां नी महा रा ष्ट्रा त 18 सभा व अनेक रो ड शो केले. 18 पैकी 14 जा गां वर भा जपचा परा भव झा ला. मो दी ना गपुरा त गेले नाहीत. तेथे भा जपचे नि ती न गडकरी वि जयी झा ले. भा रती य जनता पक्षा चा ‘आरो प’ हो ता की , महा रा ष्ट्रा त मो दीं चा फो टो लावून शि वसेनेचे खा सदा र जिं कजिं ले. भा जपचा हा भ्रम या वेळी लो कां नी तो डला . उद्धव ठा करे यां चा चेहरा घेऊन शि वसेनेचे नऊ खा सदा र जिं कजिं ले व शरद पवा रां चा चेहरा घेऊन रा ष्ट्रवा दी काँ ग्रेसचे आठ खा सदा र वि जयी झा ले. उलट महा रा ष्ट्रा त ‘मो दी मो दी ’ करणा ऱ्यां चा आकडा 23 वरून 9 वर आला . महा वि का स आघा डी ने 30 जा गा जिंकल्या त्या मो दीं शि वा य.

मोदींशी मैत्रीपेक्षा शत्रुत्व फायद्याचं

मो दी वगैरे लो कां शी मैत्री ठेवण्या पेक्षा त्यां च्या शी शत्रुत्व केले तर ते फा यद्या चे ठरते. मो दी व त्यां चा मतलबी पक्ष त्यां ना संकटा त सा थ देणा ऱ्या मि त्रांना च संपवून टा कतो हा अनुभव आहे. त्या मुळे चंद्रा बा बू ना यडू यां नी अत्यंत सा वध रा हि ले पा हि जे. बा बूंचे बो ट धरून भा जप आंध्रात घुसला आहे. बा बूंना संपवा यचा प्लॅन त्यां च्या डो क्या त घो ळतच असेल. नवी न पटना यक यां च्या बि जू जनता दला ने दहा वर्षे दि ल्ली त मो दी यां च्या सरका रला बि नशर्तपा ठिं बा दि ला. दहा वर्षां नी ओडि शा तून नवी न पटना यक व बि जू जनता दला स भा जपने संपवून टा कले. पटना यक हे आता वनवा सा तच गेले. देशभरा त भा जपने हेच आणि हेच केले. भा जप हा मि ठा ला व शब्दा ला जा गणा रा पक्ष ना ही आणि मो दी हे त्या बा बती त प्रख्या त आहेत. मो दी यां चे भा रती य सभ्यता व संस्कृती शी ना तेना ही हे चंद्रा बा बू वगैरे लोकां ना मा ही त आहेच, पण बा बू यां नी ही रा जका रणा त अनेक उन्हा ळे-पा वसा ळे पा हि ले आहेत. त्या मुळे भा रतीय सभ्यता व लोकशा ही ला इजा पो हो चेल असे कृत्य ते करणा र ना ही त. मो दी यां ना ति सऱयां दा शपथ घ्या यची आहे म्हणून तेनि तीश कुमा र व चंद्रा बा बूंचा वा पर करती ल, पण ही ति सरी ‘कसम’ म्हणजे मो दी भा जपच्या अंका चा चौ था अंक ठरेल. पडद्या मा गची नवी पटकथा घडता ना देश पा हत आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.