AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या निघायचंय, तातडीने बॅगा भरा… नाना पटोले यांच्या सर्व खासदारांना सूचना

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या सर्वच खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेतही असंच यश मिळवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. तसेच काही जागा आपल्याला मिळाल्या असत्या तर आजचं चित्र आणखी वेगळं असतं, असंही नाना पटोले म्हणाले.

उद्या निघायचंय, तातडीने बॅगा भरा... नाना पटोले यांच्या सर्व खासदारांना सूचना
नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2024 | 7:58 PM
Share

उद्या संध्याकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांना दिल्लीला यायचं आहे. विशाल पाटील काल दिल्लीला जाऊन आले. तुम्हालाही निघायचं आहे. बॅगा भरून ठेवा, अशा सूचना देतानाच मात्र, ही बॅग कपड्यांची असावी, एकनाथ शिंदे यांच्या बॅगेसारखी नको, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत असताना त्यांनी या सूचना केल्या आहेत.

आपल्या सर्वच्या सर्व 14 खासदारांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी खासदार निवडून आणण्यात मदत केली त्यांचे आभार. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे देखील आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. महाराष्ट्रच्या जनतेचं देखील मी आभार व्यक्त करतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यामुळे ही निवडणूक घराघरात पोहोचली. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष उभा राहिला, असं नाना पटोले म्हणाले.

सर्व श्रेय राहुल गांधींना

आज देशाचं संविधान बदलण्याच काम सुरू होतं. ते आपण थांबवलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला, त्यातून भाजपला सबक मिळाला आहे. ही लोकांची निवडणूक होती. या वेळेस सगळे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे. या सर्वांचं श्रेय राहुल गांधींना जातं, असंही ते पटोले म्हणाले.

खूप भयानक परिस्थिती

आज राज्यात दुष्काळ आहे. काँग्रेसने लगेच एक समिती स्थापन केली. आम्ही राज्यभर फिरून आढावा घेत आहोत. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण या सरकारला कशाचंही पडलेलं नाही. राज्यात खूप भयानक परिस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

पंजा दिसला पाहिजे

या अडचणीच्या परिस्थितीत काँग्रेसने ही लढाई हिमतीने लढली. या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही. अमोल कीर्तिकर जिथे उभे होते, ती जागा आपली होती. वर्षा गायकवाड यांचीही जागा काढून घेतली. या दोन्ही जागा आम्हाला दिल्या असत्या तर महाविकास आघाडीचा फायदा झाला असता. पण हा लढा अजून संपलेला नाही. आपल्याला आता सुरुवात करायची आहे. ताकतीने विधानसभेला उतरायचं आहे. आता काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा