Nandigram Election Result 2021 LIVE : ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव; सुवेंदू अधिकारींचा निसटता विजय

Nandigram Assembly Election Result 2021 Live Update in Marathi | नंदीग्राममध्ये भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकारी विजयी झाले असून ममता बॅनर्जींचा पराभव झाला आहे.

Nandigram Election Result 2021 LIVE : ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये पराभव; सुवेंदू अधिकारींचा निसटता विजय
Nandigram Assembly Election Result
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:25 PM

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रविवारी जाहीर झालेल्या निकालात (West Bengal Assembly Election 2021) तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. राज्यातील सर्वात प्रतिष्ठेचा मतदारसंघ असलेल्या नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा चुरशीच्या लढतीत भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा निसटता विजय झाला आहे. ममता बॅनर्जी यांचा 1622 मतांनी पराभव झाल्याची माहिती समोर आली आहे.  (Nandigram Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

सुरुवातीच्या कलांनुसार नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी पिछाडीवर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यात सातत्याने काँटे की टक्कर सुरु होती. सध्या तृणमूल काँग्रेस 212 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप अवघ्या 78 जागांवर आघाडीवर आहे.

8 उमेदवार मैदानात, पण लढत दोघात

पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात नंदीग्राम मतदारसंघ येतो. ही पश्चिम बंगालमधील सर्वात हाय प्रोफाईल सीट आहे. नंदीग्राममध्ये एकूण 8 उमेदवार मैदानात आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जी, भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी, सीपीआयएमच्या नेत्या मिनाक्षी मुखर्जी यांच्यासह इतर पाच उमेदवार मैदानात आहे. परंतु, मुख्य लढत ही ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातच आहे. सुवेंदू अधिकारी हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघाच्या इतिहासात इथे पाच वेळा CPI, दोन वेळा CPM, दोन वेळा काँग्रेस, एक वेळ जनता पार्टी आणि तीन वेळा TMC ने विजय मिळवला आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या जवळपास अडीच लाख आहे.

कोण आहेत सुवेंदू अधिकारी?

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सध्या कोणत्या नेत्याची सर्वाधिक चर्चा होत असेल तर ते आहेत सुवेंदू अधिकारी. सुवेंदू अधिकारींनी काही दिवसांआधीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. ममता बॅनर्जींसोबत नंदीग्राम आंदोलनात मुख्य भूमिका घेणारे सुवेंदू अधिकारी आता ममता बॅनर्जींच्याविरोधात निवडणुकीत उतरले आहेत. नगरसेवक, नगराध्यक्ष, आमदार आणि खासदार राहिलेले अधिकारी यांचा जंगल महल परिसरात मोठ्या प्रमाणात प्रभाव आहे. राजकीय परिवाराशी संबंधित असलेले शुभेंदु अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये विविध विभागांचे मंत्री होते. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे सुद्धा राजकारण आहेत. शिवाय दिब्येंदु अधिकारी हे सुद्धा राजकारणात आहेत. (Nandigram Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

2016 ला काय घडलं? 

2016मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममध्ये भाजपला साडे पाच टक्क्याहून कमी मते मिळाले होते. या मतदारसंघात एकूण वैध मते 2 लाख 1 हजार 552 आहेत. भाजपचे उमदेवार बिजन कुमार दास यांना केवळ 10 हजार 713 मते मिळाली होती. तर तृणमूलचे तेव्हाचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममधून महाविजय मिळवला होता. त्यांना 1 लाख 34 हजार 623 मते मिळाली होती. त्यांना एकूण 67.2 टक्के मते मिळाली होती. त्यांनी सीपीआयचे उमेदवार अब्दुल कबीर शेख यांना 81 हजार 230 मतांनी पराभूत केलं होतं. कबीर शेख यांना केवळ 53 हजार 393 मते मिळाले होते. या ठिकाणी भाजप तिसऱ्या नंबरवर फेकली गेली होती. मात्र दोन आणि तिसऱ्या नंबरच्या उमेदवारांमध्येही 40 हजार मतांचा फरक होता.

एम’ फॅक्टर चालणार?

नंदीग्रामवर तृणमूलचा 2009पासून ताबा आहे. टीएमसीने बंगालमध्ये 2011मध्ये एन्ट्री केली. लेकीन 2009च्या पोटनिवडणुकीत टीएमसीने नंदीग्राममध्ये विजय मिळवला होता. फिरोजा बीवी या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. 2011मध्येही फिरोजा बीवी दुसऱ्यांदा विजयी झाल्या होत्या. त्यामुळे नंदीग्राममध्ये मुस्लिम मतेही निर्णायक असल्याचं अधोरेखित झालं होतं.नंदीग्राममध्ये एकूण दोन ब्लॉक आहे. नंदीग्राम-1 आणि नंदीग्राम-2 ही दोन ब्लॉक आहे. पहिल्या ब्लॉकमध्ये 35 टक्के मुस्लिम मतदार आहेत. दुसऱ्या ब्लॉकमध्ये 15 टक्के अल्पसंख्याक आहेत. त्यांची एकूण मते 62 हजार आहेत. तर नंदीग्राममध्ये सव्वा दोन लाख तरुण मतदार आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात विजयाचं दान टाकतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Nandigram Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

एकूण मतदार

2016च्या निवडणुकीत या मतदारसंघात एकूण 231866 मतदार होते. त्यापैकी 201659 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी एकूण 271 पोलिंग बुथ तयार करण्यात आले होते. त्यावेळी या मतदान केंद्रांवर 87 टक्के मतदान झालं होतं.

पहिलं मतदान कधी?

नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा 1967मध्ये मतदान पार पडलं होतं. या पहिल्या निवडणुकीत सीपीआयचा उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर या सीटवर सीपीआयचा दबदबा राहिला होता. 2011च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीला पहिल्यांदा विजय मिळाला होता. (Nandigram Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

गेल्या निवडणुकीतील आकडा

विद्यमान आमदार : सुवेंदू अधिकारी मिळालेली एकूण मते : 134623 एकूण मतदार : 231866 मतांची टक्केवारी : 86.97 टक्के एकूण उमेदवार : 5

संबंधित बातम्या:

Assembly Election Result 2021: बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू कुणाचे?; रविवारी लागणार निक्काल!

TV9-POLSTRAT Exit Poll result 2021 : पाचपैकी दोन राज्यात भाजप पुढे, बंगालच्या वाघीण ममता बॅनर्जीच!

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासह पत्नीलाही दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, मात्र, टीएमसीवर निशाणा सुरुच

(Nandigram Election Result 2021 LIVE West Bengal Assembly Seat)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.