Assembly Election Result 2021: पाच राज्यांचा निकाल, प. बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू कुणाचे?

गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. ( Assembly Election result 2021 for west bengal, kerala, tamil nadu, assam and puducherry)

Assembly Election Result 2021: पाच राज्यांचा निकाल, प. बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू कुणाचे?
narendra-modi-Mamata-Banerjee_Rahul Gandhi
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 6:54 AM

कोलकाता: गेल्या महिन्याभरापासून आरोप-प्रत्यारोपामुळे गाजलेल्या पाचही राज्यांचा निवडणुकांचा  आज निकाल लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. त्यामुळे कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ( Assembly Election result 2021 for west bengal, kerala, tamil nadu, assam and puducherry)

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. आसाममध्ये एकूण 126 जागा आहेत. केरळमध्ये 140, तामिळनाडूत 234 आणि पुद्दुचेरीत 30 जागा आहेत. या सर्व जागांसाठी उद्या रविवारी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आसामसह केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. तर भाजप आणि तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालवर सर्वाधिक फोकस केला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं असून बंगालमध्ये काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

दुपारपर्यंत अंदाज येणार

रविवारी सकाळी 8 वाजता या पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत या पाचही राज्यात कुणाची सत्ता येणार याचा अंदाज येणार आहे. पुद्दुचेरीचा संपूर्ण निकाल दुपारी 3 वाजेपर्यंत येण्याची शक्यता आहे. इतर चार राज्यांचे संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी रात्री उशिर होऊ शकतो, असं सांगितलं जातं. कोरोना संकटाचे नियम पाळून मतमोजणी होणार असल्याने निकाल हाती येण्यास उशिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षीय बलाबल (2016)

आसाम

भाजप – 60 आसाम गण परिषद – 14 बोडोलँड पिपल्स फ्रंट – 12 काँग्रसे – 26 ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट – 13 अपक्ष – 01

पश्चिम बंगाल

तृणमूल काँग्रेस -219 काँग्रेस -23 डावे – 19 भाजप – 16 एकूण – 294

केरळ

सीपीआय (एम) -58 काँग्रेस -22 सीपीआय – 19 आयएमएल – 18 अपक्ष- 06 भाजप-01 इतर – 16 एकूण जागा- 140

तामिळनाडू

एमआयएडीएमके आघाडी- 134 डीएमकेला- 98

पुद्दुचेरी

काँग्रेस- 15 ऑल इंडिया एनआर काँग्रेस- 8 एआयएडीएमके- 4 डीएमके-2  ( Assembly Election result 2021 for west bengal, kerala, tamil nadu, assam and puducherry)

संबंधित बातम्या:

 बंगाल कुणाचे? एक्झिट पोलमध्ये मतमतांतरे; मुख्यमंत्रीपदासाठी मात्र ममतादीदींनाच सर्वाधिक पसंती

Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित?

Assam Exit Poll Result 2021 | आसाम विधानसभा निवडणुकीत NDA आणि UPA मध्ये कांटे की टक्कर

Exit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकड्यांकडे देशाचं लक्ष

( Assembly Election result 2021 for west bengal, kerala, tamil nadu, assam and puducherry)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.