Exit Poll Results 2021: बंगाल कुणाचे? एक्झिट पोलमध्ये मतमतांतरे; मुख्यमंत्रीपदासाठी मात्र ममतादीदींनाच सर्वाधिक पसंती

पश्चिम बंगाल कुणाचे? यावर एक्झिट पोलमध्येच मतमतांतरे असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी ममता बॅनर्जी याच फेव्हरीट असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून आलं आहे. (Mamata most popular CM 4th time in a row, finds Mood of the Nation survey)

Exit Poll Results 2021: बंगाल कुणाचे? एक्झिट पोलमध्ये मतमतांतरे; मुख्यमंत्रीपदासाठी मात्र ममतादीदींनाच सर्वाधिक पसंती
mamata banerjee
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 10:39 AM

कोलकाता: पश्चिम बंगाल कुणाचे? यावर एक्झिट पोलमध्येच मतमतांतरे असली तरी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी ममता बॅनर्जी याच फेव्हरीट असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून आलं आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रीपदासाठी 43 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर भाजपचे दिलीप घोष यांना 6 टक्के, सुवेंदू अधिकारी यांना 5 टक्के तर अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना 4 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. विशेष म्हणजे भाजपमधून कोणीही मुख्यमंत्री चालेल या प्रश्नाला 26 टक्के लोकांनी कौल दिला आहे. यावरून मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचं गारुड पश्चिम बंगालच्या जनतेवर अजूनही असल्याचं दिसून येत आहे. (Mamata most popular CM 4th time in a row, finds Mood of the Nation survey)

उद्या रविवारी 2 मे रोजी पश्चिम बंगालसह पाच राज्यांचा निवडणूक निकाल लागणार आहे. पश्चिम बंगालची कुणीच सत्ता येणार याबाबत देशवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही एक्झिट पोलच्या मते ममता बॅनर्जी सत्ता राखतील असा अंदाज आहे. तर काहींनी भाजप सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. परंतु, इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्रीपदासाठी 43 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांनाच कौल दिला आहे.

कुणाली किती पसंती?

ममता बॅनर्जी- 43% दिलीप घोष- 6% बीजेपीतून कोणीही- 26% TMCमधून कोणीही- 1% सुवेंदू अधिकारी- 5% मिथुन चक्रवर्ती- 4% बाबुल सुप्रियो- 1% मुकुल रॉय- 1% लेफ्ट फ्रंटमधून कोणीही- 5% अब्बास सिद्दीकी- 1% अधीर रंजन चौधरी- 1% काँग्रेसमधून कोणीही- 1% सूर्यकांत मिश्रा- 1% बुद्धदेव भट्टाचार्जी- 1% माहीत नाही/ इतर … 1%

ममता बॅनर्जी स्ट्रिट फायटर

गेल्या दहा वर्षांपासून ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. लढाऊ आणि स्ट्रिट फायटर नेत्या म्हणून त्या परिचित आहेत. त्याचं प्रतिबिंब एक्झिट पोलच्या अंदाजातही दिसून येत आहे. मात्र, असं असलं तरी यावेळी ममता बॅनर्जी यांच्या फार कमी जागा निवडून येण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यांचं संख्याबळ घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा?

ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज टीव्ही 9- पोलस्टारच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जोर लावलेल्या भाजपचा बंगालमधील सत्ता स्थापनेचं स्वप्न हे तूर्तास पूर्ण होणार नाही.

तृणमूल (TMC) – 142 ते 152 भाजप (BJP) – 125 to 135 डावे + काँग्रेस (LEFT+ Congress) – 16 to 26 अन्य (OTH) – एकूण – 292 (Mamata most popular CM 4th time in a row, finds Mood of the Nation survey)

संबंधित बातम्या:

Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : AIDMK ला DMK चा धोबीपछाड, तामिळनाडूत सत्तापरिवर्तन निश्चित?

Assam Exit Poll Result 2021 | आसाम विधानसभा निवडणुकीत NDA आणि UPA मध्ये कांटे की टक्कर

Exit Poll Results 2021 LIVE : पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता, एक्झिट पोलच्या आकड्यांकडे देशाचं लक्ष

(Mamata most popular CM 4th time in a row, finds Mood of the Nation survey)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.