UP Election opinion poll : योगींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार? जाणून घ्या निवडणूक पूर्व सर्व्हेचा अंदाज

UP Election opinion poll : योगींच्या नेतृत्वात उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचं सरकार? जाणून घ्या निवडणूक पूर्व सर्व्हेचा अंदाज
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव

पाच राज्याच्या निवडणुका (Five state Elections 2022) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, अशा वेळी यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला? याचा अंदाज घ्यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळेच झी मीडिया आणि डिझाईन बॉक्स्ड यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांबाबत ओपिनियन पोल सर्वेक्षण केले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 19, 2022 | 10:00 PM

उत्तर प्रदेशपाच राज्याच्या निवडणुका (Five state Elections 2022) काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, अशा वेळी यंदाच्या निवडणुकीत जनतेचा कौल कुणाला? याचा अंदाज घ्यायला सुरूवात झाली आहे. त्यामुळेच झी मीडिया आणि डिझाईन बॉक्स्ड यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांबाबत ओपिनियन पोल सर्वेक्षण केले आहे. यामध्ये प्रत्येक जागेचे सविस्तर व सखोल सर्वेक्षण करण्यात आले आहे. निवडणुकीत जनमत हे सर्वोपरि असते. या ओपिनियन पोलला कोणत्याही प्रकारे निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही हेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले आहे. ज्यामध्ये लोकांच्या मतांचा समावेश आहे. यात आपण सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशचा पोल (Up Election opinion poll) काय सांगतो हे पाहणार आहोत.

उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात?

भाजप-245-267 जागा मिळू शकतात

समाजवादी पक्ष-125-148 जागा मिळू शकतात

बसपा 5-9 जागा मिळू शकतात

काँग्रेस- 3-7 जागा मिळू शकतात

इतर- 2-6 जागा असू शकतात

यूपीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी आवडता चेहरा

47 टक्के लोकांनी सीएम योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली आहे

तर अखिलेश यादव यांना 35 टक्के लोकांची पसंती आहे

९ टक्के लोकांनी मायावती मुख्यमंत्री म्हणून आवडतात

तर प्रियांका गांधी वाड्रा यांना ५% लोकांनी पसंत केले आहे

4 टक्के लोकांना मुख्यमंत्री म्हणून याव्यतिरिक्त चेहरा हवा आहे

उत्तर प्रदेशात कोणत्या पक्षाला किती टक्क मतं?

भाजपची मतांची टक्केवारी 41 टक्के असू शकते

समाजवादी पक्षाकडे 34 टक्के असू शकतात

काँग्रेस पक्ष 6 टक्के राहण्याचा अंदाज आहे

बसपा यावेळी 10 टक्के होण्याची शक्यता आहे

9 टक्के इतरांच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे

5 राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. उत्तर प्रदेशला मिनी लोकसभा म्हणून ओळखले जाते, देशाचे पंतप्रधानही याच राज्यातून निवडणूक लढवतात. त्यामुळे आता योगींबरोबर मोदींचीही प्रतीष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे हा पोल किती खरा ठरतो हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल.

Goa Assembly Election : उत्पल पर्रीकरांना भाजपकडून 2 मतदारसंघाची ऑफर, पण पर्रीकर पणजीवर ठाम! संभ्रम कायम

वातावरण आणखी तापलं! नाना पटोलेंविरोधात भाजपकडून 100 हून अधिक तक्रारी दाखल

Nagar Panchayat Election Result : मुख्यमंत्री असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला, फडणवीसांचा शिवसेनेला जोरदार टोला

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें