Election Result 2022 Live: ही तर सुरुवात आहे, पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू: आदित्य ठाकरे

उत्तर प्रदेश आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे. सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत.

Election Result 2022 Live: ही तर सुरुवात आहे, पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू: आदित्य ठाकरे
ही तर सुरुवात आहे, पुन्हा लढू, आज ना उद्या पर्याय बनू: आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 10, 2022 | 7:47 PM

मुंबई: उत्तर प्रदेश (uttar pradesh) आणि गोव्यात आम्हाला यश आलं नाही. पण ही तर सुरुवात आहे. सुरुवात करणं गरजेचं असतं. सर्वच पक्षाने कधी ना कधी सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही लढत राहू. इतर सर्व राज्यातील निवडणुका आण्ही लढवणार आहोत, या मतावर आम्ही ठाम आहोत. कधी तरी पर्याय म्हणून तिथे उभं राहू, असा विश्वास शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी व्यक्त केला. पाच राज्यातील निवडणुकांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना आदित्य ठाकरे यांनी हा विश्वास व्यक्त केला. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकांना वेगवेगळे कंगोरे आहेत. पंजाबमध्ये (punjab) आप पर्याय म्हणून उभी राहिली आहे. बंगालमध्ये तृणमूल पर्याय बनली आहे. तशीच महाराष्ट्रात आघाडी पर्याय बनली आहे. देशात हे पर्याय येत आहेत, असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

लोकांना विश्वास बसणं गरजेचं होतं. शिवसेना ठामपणे उभी राहील. आता प्रत्येक निवडणूक लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे लोकांसमोर सीरियसनेस वाढेल. पुढच्या काही निवडणुकात मतांच्या मार्फत दाखवलेला विश्वास वाढेल. ही सुरुवात होती. आधी तीन जागा लढवल्या. आता 11 लढवल्या. अजून लढवू. कधी ना कधी तरी यश येईल. अनेक पक्षांची अशीच सुरुवात झाली. सुरुवातीला लढताना त्यांचं अस्तित्व नगण्य होतं. आज ते देशात पसरले आहेत. सुरुवात कुठून तरी करावी लागते ती आम्ही केली आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

तिन्ही पक्ष जोमाने लढणार

यावेळी पंजाबमधील आपच्या विजयावरही त्यांनी भाष्य केलं. आपने पंजाबमध्ये पाच वर्ष मेहनत घेतली. दिल्लीत त्यांची तिसरी टर्म आहे. महाराष्ट्रात आमची पहिली टर्म आहे. तरी आम्ही महाराष्ट्राबाहेर लढण्याचं धाडस केलं. या निवडणूक निकालाने महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. उलट शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रासाठी जोमाने लढत राहील. झगडत राहील. जनतेचा आवाज बुलंद करू, असं त्यांनी सांगितलं.

ग्रामपंचायत निवडणुकाही लढवू

यावेळी त्यांनी भाजपवर बोलण्यास नकार दिला. मी त्या लोकांबाबत बोलत नाही. चांगल्या कामावर बोलतो. आम्ही हिंमतीने आणि ताकदीने लढू. ग्रामपंचायतही लढू. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ते ठेवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही सगळे मजबूतपणे महाविकास आघाडीचं सरकार चालवत आहोत. तिन्ही पक्षाच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवत आहोत. महाराष्ट्र मॉडेल लोकांपर्यंत न्यायला अवधी लागेल पण नक्कीच नेऊ, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Election Result 2022 Live: गोरेगाव बदलू शकले नाही ते गोरखपूर काय बदलणार?, आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचले

Assembly Election Result 2022 : ‘आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत’, चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.