AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election Result 2022 : ‘आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत’, चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र

चंद्रकांत पाटील यांनी तर कार्यकर्त्यांसोबत ढोल-ताशाच्या तालात ठेकाही धरला. त्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे शिवसेनेला थेट आव्हान दिलंय. आता टार्गेट मुंबई महापालिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्या दृष्टीने महापालिकेसाठी तयारी करण्याचे आदेशही पाटील यांनी यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत.

Assembly Election Result 2022 : 'आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत', चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र
मुंबई महापालिकेबाबत चंद्रकांत पाटीलं यांचं शिवसेनेला थेट आव्हानImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 10, 2022 | 5:52 PM
Share

मुंबई : उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपनं पुन्हा एकदा घवघवीत यश मिळवलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) देशभरात भाजपनं जल्लोषाला सुरुवात केलीय. महाराष्ट्र भाजपनेही प्रदेश कार्यालयाबाहेर जोरदार सेलिब्रेशन (BJP Celebration) केलं. या आनंदोत्सवात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह भाजपचे अनेक नेते सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी तर कार्यकर्त्यांसोबत ढोल-ताशाच्या तालात ठेकाही धरला. त्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे शिवसेनेला थेट आव्हान दिलंय. आता टार्गेट मुंबई महापालिका असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्या दृष्टीने महापालिकेसाठी तयारी करण्याचे आदेशही पाटील यांनी यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत.

‘पोपटाचा प्राण हा मुंबई महानगरपालिकेत अडकलेला’

पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा इरादा स्पष्ट केलाय. पाटील म्हणाले की, ‘मी आपल्या सर्वांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ही महानगरपालिका काही करुन भाजपच्या ताब्यात आली पाहिजे. पोपटाचा प्राण हा त्या महानगरपालिकेत अडकलेला आहे. आता सगळे वाभाडे निघालेत. आठवडाभरत धाडी चालल्या त्यातून स्पष्ट होईल की विकास किती केला आणि घरी किती पैसे नेले. त्यामुळे आता महापालिका हेच सर्वांचं टार्गेट असलं पाहिजे’, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटलांचे सूचक संकेत

इतकंच नाही तर पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या एका वक्यवाचा आधार घेत सूचक संकेतही दिले आहेत. आदित्य ठाकरेंनी असं म्हटलं की 2024 ला आम्ही भगवा झेंडा दिल्लीवर फडकवू. हो भगवा झेंडाच पण तो भारतीय जनता पार्टीचा भगवा. तुम्ही सोबत असाल तर तो लावण्यासाठी आम्ही तुम्हाला सोबत घेऊ, असे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले.

‘विजयाचं श्रेय मोदी आणि नड्डाजींना’

चार राज्यातील विजयावर बोलताना पाटील यांनी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय. ‘भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षतेखाली या पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. अनेकांना वाटतं की मोदींचा करिश्मा संपला. पण त्यांना अजून जमिनीवरील वास्तव माहिती नाही. ज्या प्रकारे मोदी आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उत्तर प्रदेशात योगींनी सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हे यश आहे. अनेक प्रकारच्या वावड्या उठल्या एक विशिष्ट समुदाय भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी एकत्र येणार आहे. मग हा गेला, तो गेला.. काही उत्तर प्रदेशात फरक पडला नाही. याचं कारण पुरुषांनी तर भाजपला मतदान केलंच असेल. पण महिलांनीही एकत्रितपणे भाजपला मतदान केलंय. महिलांच्या पाच महत्वाच्या गरजा भाजपनं पूर्ण केलंय. इतकंच नाही तर तिथे महिला सुरक्षित नव्हत्या. पण आज उत्तर प्रदेश, बिहारमधील वातावरण पूर्णपणे बदललं आहे. आज महिला सुरक्षितपणे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये फिरतात’, असं पाटील म्हणाले.

पाटील यांच्याकडून फडणवीसांचं तोंडभरून कौतुक

गोव्यातील विजयाबद्दल पाटील यांनी फडणवीसांचं कौतुक केलंय. पाटील म्हणाले की, आता अनेक पत्रकार मला प्रश्न विचारतात की आता पुढे काय? मी म्हटलं आता पुढे काय ते तुम्हीच बघा. आज आम्हाला मोठा विजय मिळाला त्याचा आम्हाला अभिमान आहे. खास करुन देवेंद्रजींचे मला अभिनंदन करायचं आहे. बिहारमध्ये ते प्रभारी होते. तिथे भाजप विजयी झाला. गोव्यात ते प्रभारी आहेत, तिथेही त्यांनी मोठा विजय मिळवून दिलाय.

इतर बातम्या :

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

Assembly Election Result 2022 : उत्तर प्रदेश, गोव्यात शिवसेना सपाटून पडली, संजय राऊत म्हणतात, अजून लढाई संपली नाही !

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.