AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Result 2022 Live: गोरेगाव बदलू शकले नाही ते गोरखपूर काय बदलणार?, आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचले

Election Result 2022 उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजप सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. या निकालानंतर भाजपने प्रचंड जल्लोष केला आहे. भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला.

Election Result 2022 Live: गोरेगाव बदलू शकले नाही ते गोरखपूर काय बदलणार?, आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचले
गोरेगाव बदलू शकले नाही ते गोरखपूर काय बदलणार?, आशिष शेलारांनी शिवसेनेला डिवचलेImage Credit source: ashish shelar twitter
| Updated on: Mar 10, 2022 | 7:11 PM
Share

मुंबई: उत्तर प्रदेशासह (Uttar Pradesh BJP Win) चार राज्यात भाजप सत्ता राखण्यात यशस्वी झाली आहे. या निकालानंतर भाजपने प्रचंड जल्लोष केला आहे. भाजप (BJP) कार्यालयाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशे वाजवून आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला. यावेळी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला (shivsena) डिवचले. काही लोक गोरखपूरमध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते. जे मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत ते गोरखपूर काय बदलणार? असा खोचक टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. तसेच मोदी है तो मुमकीन है, असं शेलार म्हणाले. भाजपा प्रदेश कार्यालया समोर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नेतृत्वाखाली जोरदार जल्लोष करण्यात आला, यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. तर चार राज्यात मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी याचे तसेच गोव्याच्या यशाची रणनीती आखणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी अभिनंदन केले.

2024 साली दिल्लीच्या खुर्चीत आम्ही पुन्हा बसणार. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा… अशांसह बोरु बहाद्दर मोठ्या वल्गना करीत होते. पण सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले. अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल होऊन शिवसेना हारली, अशी टीका त्यांनी केली.

एक मासो आणि खंडी भर रस्सो

शिवसेनेची अवस्था “एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, असा मालवणी भाषेतून त्यांनी टोलाही लगावला. तर नोटा पेक्षा कमी मते घेऊन शिवसेना पराभव झाला हेही त्यांनी अधोरेखित केले. गोरखपूरमध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते. जे मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत ते गोरखपूर काय बदलणार? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

आपले नाही धड अन् शेजाऱ्याचा कढ

शेलार यांनी पंजाबच्या निवडणूक निकालावर ट्विट करतही शिवसेनेला डिवचले आहे. अरविंद केजरीवालांचा आता बहुतेक शिवसेना भवनात जंगी सत्कार होईल. शिवाजी पार्कमध्ये हत्तीवरून युवराज साखर सुध्दा वाटतील. शेजाऱ्यांच्या घरात पाळणा हलला की, पेढे वाटपाचे कार्यक्रम करुन दाखवले जातात. आपले नाही धड अन् शेजाऱ्याचा कढ, अशी त्यांची अवस्था आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Assembly Election Result 2022 : ‘आता पोपटाचे प्राण फक्त महापालिकेत’, चार राज्यातल्या यशानंतर चंद्रकांत पाटलांकडून शिवसेनेवरचा हल्ला तीव्र

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.