पोट्टे म्हणतात मुसलमान अफजलखान असतात; ‘खालिद का शिवाजी’ दाखवाल तर थिएटर तिथेच… बड्या नेत्याची धमकी
खालिद का शिवाजी या सिनेमावरुन मोठा वाद सुरु आहे. या सिनेमा जर चित्रपटगृहांमध्ये लागला तर... एका बड्या नेत्याने थेट मल्टीप्लेक्सच्या मालकांना धमकी दिली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया...

इतिहासाशी संबंधीत सिनेमांवरुन वाद निर्माण होणे ही काही नवी बाब नाही. कधीकधी सिनेमांमधून देण्यात आलेल्या सामाजिक संदेशावरही प्रश्न उपस्थित केले जातात. सध्या ‘खालिद का शिवाजी’ हा चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. तो पाहून चित्रपटावर मराठा आणि मुसलमान समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका बड्या नेत्याने तर ‘खालिद का शिवाजी’ दाखवाल तर थिएटर तिथेच… अशी धमकी दिली आहे.
काय मिळाली धमकी?
खालिद का शिवाजी या चित्रपटाचा जो काही टीझर लाँच झाला आहे यातून जाणूनबुजून मराठा आणि मुसलमान समाजात तेढ निर्माण करण्याच प्रयत्न केला जात आहे. जो कोणी लेखक आहे तो अतिषय फाल्तू आहे. महाराजांचे सरदार मुघल विचाराचे नव्हते. ते मुघलांच्या विरोधात लढले होते. गणेशउत्सवाच्या आधी यांना हा रिलीज करायचा होता. त्यानंतर काही भांडणं मतभेद निर्माण करून दंगल घडवण्याचं काम दिग्दर्शकाकडून होणार होता. एक महिनाभर तरी स्थगिती द्यावी, अशी आम्ही विनंती करतो असे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले, गृहविभागाकडे विषेश पथक लावून चौकशी अधिकारी नेमला पाहिजे आणि चुकीचा इतिहास का दाखला जात आहे? मुख्यमंत्र्यांनी आम्हा कार्यकर्त्यांचं ऐकून घेतलं. यामागील सूत्रधार मुख्यमंत्री लवकरच बाहेर काढतील. हा चुकीचा इतिहास लोकांना का दाखवतोय याची चौकशी केली पाहिजे. यामागील सूत्रधार लवकरच बाहेर काढतील. सध्या एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. कोणाच्या माध्यमातून हा चित्रपट पाठवण्यात आलं आहे याची चौकशी झाली पाहिजे.
‘खालिद का शिवाजी’ सिनेमाविषयी
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले आहे. तसेच या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुशष्मा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे.
