AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू – सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा

प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ सोनम वांगचूक हे गेल्या 19 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यावरून देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच आमिरने प्रतिक्रिया देताना '3 इडियट्स'मधील फुंगसूक वांगडूच्या भूमिकेबद्दल स्पष्ट केलं.

Sonam Wangchuk: फुंगसूक वागडू - सोनम वांगचूक यांचा संबंधच नाही; आमिर खानचा खुलासा
Aamir Khan and Sonam WangchukImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 17, 2026 | 12:38 PM
Share

NEET पेपर घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी उपोषण करत आहेत. गेल्या 19 दिवसांपासून ते उपोषणाला बसले असून आता देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यात बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही पुढे आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘3 इडियट्स’मध्ये चतुरची भूमिका साकारणारा अभिनेता ओमी वैद्यने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. “फुंगसूक वांगडूला आम्ही मरताना नाही पाहू शकत”, असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. ‘3 इडियट्स’मध्ये आमिर खानने साकारलेली फुंगसूक वांगडूची भूमिका सोनम वांगचूक यांच्यात आयुष्यावर आधारित असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यावर आता आमिर खानने स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाला आमिर खान?

नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खानला ‘3 इडियट्स’मधील त्याच्या भूमिकेवरून प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर आधारित त्यातील कोणतीच भूमिका नव्हती, असं आमिरने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला, “नाही, हा एक गैरसमज आहे. जेव्हा आम्ही ‘3 इडियट्स’ हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहितीच नव्हतं. मी नुकताच चतुरचा (ओमी वैद्य) व्हिडीओ पाहिला होता. त्यात त्याने जे म्हटलंय, ते चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो की ना राजकुमार हिरानी, ना अभिजात जोशी, जे दोन लेखक आहेत, ना मी.. आमच्यापैकी कोणालाच सोनम यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.”

यावेळी सोनम वांगचूक यांच्या कामाबद्दल आमिर म्हणाला, “ते खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना असण्यासाठी त्यांचं ‘3 इडियट्स’मधल्या कुठल्याही पात्रावर आधारित राहणं गरजेचं नाही. त्यांनी आजवर जे काही काम केलं, ते उत्तमच आहे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्यापैकी कोणालाच त्यांच्याविषयी माहित नव्हतं. इतकंच नव्हे तर, खुद्द सोनम वांगचूक यांनी याविषयी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांच्यावर ती भूमिका आधारित नाही.”

‘3 इडियट्स’ या चित्रपटात आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी आमिरने रँचो अर्थात फुंगसूक वांगडूची भूमिका साकारली होती.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...