रजनीकांत स्टारर ‘कुली’ सिनेमात काम करण सर्वात मोठी चूक…, खरंच असं म्हणाला आमिर खान?
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने सांगितलं होतं की, सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'कुली' सिनेमाची कथा न ऐकताच काम करण्यास होकार दिला होता. ज्यामुळे अभिनेता म्हणाला, ''कुली' सिनेमात काम करण सर्वात मोठी चूक'

दिग्दर्शक लोकेश कनागराज दिग्दर्शत ‘कुली’ सिनेमाचा सर्वत्र बोलबाला पाहायला मिळाल. कायम सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत दिग्दर्शकाचा पहिला सिनेमा होता. सिनेमात देशभरातील अनेक सेलिब्रिटींना कास्ट करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेता आमिर खान याचं देखील नाव आहे. अभिनेता आमिर खान देखील या भूमिकेसाठी प्रचंड उत्याही होता. चाहत्यांना देखील वाटलं की आमिर वेगळ्या आणि हटके भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस येईल. पण असं काही झालं नाही. चाहत्यांच्या वाट्याला निराशाच आली. सिनेमा पाहिल्यांनंतर आमिर खान याच्या भूमिकेवर अनेकांनी टीका देखील केली.
‘कुली’ सिनेमात आमिर खान याने साकालेली पाहुण्या कलाकाराची भूमिका पाहिल्यानंतर, भूमिकेला काही अर्थच नाही… अशी अनेकांची प्रतिक्रिया होती. सिनेमा आमिर याची भूमिका नसती तरी काही हरकत नसती… असं देखील अनेकांनी म्हटलं.. आता आमिर खान याच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुलाखतीत लिहिल्यानुसार. मी हा कॅमिओ फक्त रजनी साहेबांसाठी स्वीकारला. खरं सांगायचं तर, मला अजूनही माहित नाही की माझ्या भूमिकेत काय करायचं होतं? असं वाटत होतं सीनसाठी गेलो. एक दोन डायलॉग म्हणालो आणि पुन्हा गायब झालो… या भूमिकेचा काही अर्थ नव्हता… भूमिकवर विचार देखील करण्यात आली नाही…
‘मी क्रिएटिवली यामध्ये सामिल नव्हतो… कारण मला माहिती नव्हतं शेवट कसा असेल… मला असं वाटलं एक कॅमिओ असेल… पण असं काही झालं नाही.’ या सिनेमात काम करणं ही त्याची चूक असल्याचं आमिरने म्हटलं आहे.
पण जेव्हा अभिनेत्याच्या वक्तव्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा आमिर असं काही बोलला नाही असं लक्षात आलं. याचा अर्थ असा की आमिरने अशी कोणतीही मुलाखत किंवा विधान दिलेलं नाही. दरम्यान, आमिर आणि लोकेश ज्या सुपरहिरो सिनेमासाठी काम करत होते, तो सिनेमा डब्बाबंद करण्यात आल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे आमिरला दिलेली ही बनावट मुलाखत व्हायरल झाली.
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, आमिर खान याने स्वतःला ‘सुपरहिरो’ सिनेमातून बाजूला केलं. कारण शुटिंग सुरु करण्यापूर्वी सिनेमाची स्क्रिप्ट पूर्ण करावी अशी आमिर याची इच्छा होती. पण शुटिंग करत असताना गरजेनुसार बदल करु… असं लोकेश याचं म्हणणं होतं. अशात ‘कुली’ ला मिळालेल्या प्रतिसादानंतर, आमिर असा धोका पत्करू शकत नव्हता. म्हणूनच त्याने या सिनेमापासून स्वतःला दूर केल्याची माहिती समोर येत आहे.
