जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांच्या अटकेवर मराठी अभिनेत्रीची बेधडक पोस्ट, सरकारवर निशाणा साधत म्हणाली…
अभिनेता जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांना अटक करण्यात आली आहे. जय दुधाणे याला तर हनिमूनला जात असतात विमानतळावरून अटक केली...आता या प्रकरणी मराठी अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेविश्वात धक्कादायक घटना घडत आहेत. आधी हेमलता बाणे आणि आता अजय दुधाणे याला पोलिसांनी घटक केली आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपासून जय त्याच्या लग्नामुळे चर्चेत होता. सोशल मीडियावर त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले. पण लग्नाच्या 11 दिवसांनंतर जय मोठ्या अडचणीत अडकला आहे. पत्नीसोबत हनिमूनला जात असताना ठाणे पोलिसांनी अभिनेत्याला विमानतळावरुन अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जय याच्यावर तब्बल 5 कोटू रुपयांची फसवणूक केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे तो देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात होता. असे आरोप पोलिसांनी जय याच्यावर केले आहे. सध्या जय याच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. दरम्यान जय याने देखील प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
तर हेमलता बाणे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिल्डरकडून 10 कोटी रुपये मागितल्याच्या आरोपाखाली हेमलता हिला अटक करण्यात आली आहे. दोन मराठी कलाकारांना अटक केल्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्रीने सरकारवर निशाणा साधला आह. अभिनेत्री आरती सोळंकी हिने दोघांच्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि म्हणाली, ‘जय दुधाणे आणि हेमलता यांनी जशी अटक झाली, तशीच अटक विजय माल्या याला कधी होणार?’
View this post on Instagram
पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘मी जय दुधाणे आणि हेमलता बाणे यांचं समर्थन करत नाही. पण असे अनेक लोक आहेत, ज्यांनी कोट्यवधींची फसवणूक कली आहे. अशा लोकांना कधी अटक होणार हा मोठा प्रश्न आहे… असं देखील आरती म्हणाली. तिच्या व्हिडीओवर देखील कमेंट करत नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.
अटकेनंतर जय दुधाणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या वडिलांची जबाबदारी घेतली. पण सगळे माझ्यावरच उलटले आहेत. सत्य लवकरच समोर येईल. मी कुठेच पळून जात नाहीजे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवलं नाही,” अशी प्रतिक्रिया जयने दिली आहे.
हेमलता बाणे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, पोलिसांनी हेमलता हिच्यासह तिच्यासोबत काम करणाऱ्या अन्य एका महिलेला बांधकाम उद्योजकाकडून पैसे मागताना रंगेहात पकडलं आहे… याप्रकरणी तिच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत.
