AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidoe | अभिनेता संदीप पाठकचा चिमुरड्यांसोबत ‘वाथी कमिंग’ डान्स, कोरोना काळात खास संदेश

मराठी मनोरंजन विश्वाचा लाडका विनोदी अभिनेता संदीप पथक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्या भन्नाट व्हिडीओंमुळे तो नेहमी चर्चेत देखील असतो. आता देखील त्याने असाच हटके अंदाजात एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कोरोना काळात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Vidoe | अभिनेता संदीप पाठकचा चिमुरड्यांसोबत ‘वाथी कमिंग’ डान्स, कोरोना काळात खास संदेश
संदीप पाठक
| Updated on: Apr 20, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : देशभरात नव्हे तर जगभरात कोरोना विषाणू पुन्हा एकदा हात-पाय पसरायला लागला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय भीषण ठरली आहे. दररोज हजारो लोक या विषाणूच्या संसर्गाने मृत्यूमुखी पडत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर देखील खूप ताण पडतोय. बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळेनासे झाले आहे. तर, दुसरीकडे लवकरात लवकर नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी सरकारने देखील अनेक योजना तयार केल्या आहेत. अशातच अनेक कलाकारसुध्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करत आहेत. अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) याने एका खास अंदाजात चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे (Actor Sandeep Pathak Share vaathi coming dance video with corona awareness message goes viral).

मराठी मनोरंजन विश्वाचा लाडका विनोदी अभिनेता संदीप पथक सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्याच्या भन्नाट व्हिडीओंमुळे तो नेहमी चर्चेत देखील असतो. आता देखील त्याने असाच हटके अंदाजात एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना कोरोना काळात स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘वाथी कमिंग’ सारख्या ट्रेंडचा त्याने हटके उपयोग केला. तर, त्याला साथ मिळालीय ती त्याच्या चिमुकल्या दोस्तांची.

पाहा संदीपचा भन्नाट व्हिडीओ

‘वाथी कमिंग’वर धमाल डान्ससह या चमूने अतिशय महत्त्वाचा असा सामाजिक संदेश देखील दिला आहे. कोरोन काळात हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, वाफ घेणे आणि महत्त्वाचे म्हणजे मास्क परिधान करणे या सगळ्या नियमांना त्यांनी आपल्या या डान्समध्ये अधोरेखित केले आहे (Actor Sandeep Pathak Share vaathi coming dance video with corona awareness message goes viral).

काय म्हणाला संदीप पाठक?

हा धमाल व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये संदीप लिहितो, ‘मी माझ्या सोसायटीतल्या (संकल्प- विवेक) छोट्या मित्रांसोबत रील केली आहे. ह्या छोट्या मित्रांचा अभिनय क्षेत्राशी काही संबंध नसताना त्यांनी ह्या रीलचं शुटींग खूप Enjoy केलं Thanks Friends. सध्याच्या कोरोना काळात “स्वत:ची काळजी घ्या” एवढा संदेश देण्याचा छोटा प्रयत्न. गोड मानून घ्या’. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत असून, संदीप आणि त्याच्या या चिमुकल्या चमूवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

संदीपची ओळख

बीड जिल्ह्यातील माजलगावच्या संदीपने महाविद्यालयीन शिक्षणानंतर ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. 2010मध्ये आलेल्या ‘श्वास’मधील त्याच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. त्यानंतर ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एक डाव धोबीपछाड’, शहाणपण देगा देवा’, ‘रंगा पतंगा’, ‘पोस्टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांतून, ‘फू बाई फू’, ‘घडलंय बिघडलंय’, ‘असंभव’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, अशा मालिकांतून, ‘असा मी असामी’, ‘लग्नकल्लोळ’, ‘जादू तेरी नजर’, ‘ज्याचा शेवट गोड’, ‘सासू माझी धांसू’ या नाटकांतून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याचा ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’चा वेगळा प्रयोगही खूप गाजला होता.

(Actor Sandeep Pathak Share vaathi coming dance video with corona awareness message goes viral)

हेही वाचा :

Rudra | ओटीटीवर धमाका करण्यासाठी अजय देवगण तयार, सीरीजमध्ये दिसणार जबरदस्त भूमिकेत!

Babil Khan | …म्हणून इरफान खानच्या आठवणी शेअर करणं सोडून दिलं, लेक बाबिलने सांगितले कारण

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.