AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संगीत संत तुकाराम’ नाटकाने तिसरी घंटा वाजणार, संजय नार्वेकर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारणार!

येत्या शुक्रवारी (11 डिसेंबर) रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा 'संगीत संत तुकाराम' या नाटकाच्या नांदीने उघडणार आहे.

‘संगीत संत तुकाराम’ नाटकाने तिसरी घंटा वाजणार, संजय नार्वेकर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ साकारणार!
| Updated on: Dec 10, 2020 | 1:39 PM
Share

पुणे : येत्या शुक्रवारी (11 डिसेंबर) रोजी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा ‘संगीत संत तुकाराम’ या नाटकाच्या नांदीने उघडणार आहे. यानिमित्ताने ‘कोव्हिड-लॉकडाऊन’मुळे गेली नऊ महिने ठप्प पडलेली मराठी व्यावसायिक नाटके नव्याने सुरू होणार आहेत. यावेळी नाट्य व्यवसायाला गती देणारी ‘तिसरी घंटा’ वाजवण्याचा बहुमान ‘रसिकप्रिय’ सिने-नाट्य अभिनेते संजय नार्वेकर (Actor Sanjay Narvekar) यांना देण्यात आला आहे. तसेच संजय नार्वेकर या नाटकाच्या तुकोबा भेटीच्या प्रवेशात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांची भूमिका साकारणार आहेत (Actor Sanjay Narvekar playing Chhatrapati Shivaji Maharaj in Sangeet Sant Tukaram).

‘ओमनाट्यगंधा-मुंबई’ निर्मित ‘संगीत संत तुकाराम’ या नाटकाचे ‘कोरोना-लॉकडाऊन’च्या आधी वर्षभरात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह व-हाड, विदर्भ, खानदेश, मराठवाडा, प.महाराष्ट्र, कोकण असे महाराष्ट्रभरात 80हून अधिक प्रयोग झाले आहेत.

ऐतिहासिक नोंदी उमटवलेले नाटक

ज्येष्ठ पत्रकार-संपादक व नाटककार ज्ञानेश महाराव यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ते या नाटकात गायक-नटाची ‘विनोदी’ भूमिकाही सकारात आहेत. या विशेष प्रयोगाविषयी सांगतान ज्ञानेश म्हणतात, ‘हे नाटक अनेक अर्थानी गाजलेले आणि मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक नोंदी उमटवलेले नाटक आहे. ‘राजापूरकर नाटक मंडळी’चे मालक नटश्रेष्ठ बाबाजीराव राणे यांनी हे नाटक 1912मध्ये रंगभूमीवर आणले. ते खूप गाजले, जोरात चालले. त्यात राणे ‘तुकोबांच्या पत्नी’ची भूमिका करीत. ही भूमिका करीत असतानाच त्यांचे 1917मध्ये नागपूरमध्ये रंगमंचावरच निधन झाले.

या ‘योद्धा’ रंगकर्मीच्या नाट्यसेवेचे स्मृती शताब्दी वर्षात जागरण व्हावे; तसेच ऐतिहासिक-प्रासादिक असूनही वर्तमानाला भिडणारे नाट्यरसिकांना पाहायला मिळावे, या उद्देशाने हे नाटक रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. खामगाव, गोंदीया, गेवराई, जालना, नांदेड, श्रीगोंदा, जामखेड येथे खुल्या मैदानात पाच हजाराहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत ‘लाइव्ह’ प्रयोग झाले.’ (Actor Sanjay Narvekar playing Chhatrapati Shivaji Maharaj in Sangeet Sant Tukaram)

नव्याने सादर केलेल्या या नाटकाची रंगावृत्ती ज्ञानेश महाराव यांनी केली असून, दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले आहे. गायक-नट विक्रांत आजगावकर यांनी तुकाराम महाराज ‘साक्षात’ उभे केले आहेत. गायकीच्या क्षेत्रात त्यांची ओळख ‘प्रतिबालगंधर्व’ अशी आहे. उर्वरित नटसंचात सिने-सिरियल कलावंत आहेत. ‘कॉमेडी किंग’ संतोष पवार ‘मंबाजी’च्या भूमिकेत धमाल आणणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत संजय नार्वेकर

“संगीत संत तुकाराम” या नाटकाच्या लॉकडाऊन नंतरच्या पहिल्या प्रयोगात सहभाग घेणारे अभिनेते संजय नार्वेकर सांगतात, ‘लॉकडाउन नंतरच्या या पहिल्या नाट्य प्रयोगाची तिसरी घंटा मी देतोय आणि तुकोबा भेटीचा प्रवेश छत्रपतींची भूमिका करुन करतोय. लॉकडाऊननंतर नाटकं परत सुरू होण्याच्या दृष्टीने ही चांगली सुरुवात आहे. त्यात आपल्याला तिसरी घंटा वाजवण्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी भूमिका करण्याची संधी मिळतेय तर केली पाहिजे, असं मला वाटलं. आपण रंगभूमीला काहीतरी देणं लागतो. रंगभूमी अभूतपूर्व संकटातून नव्याने सुरू होत असताना काहीतरी केलं पाहिजे;  त्यात आपला सहभाग असावा, म्हणून मी ही भूमिका करतोय!’

(Actor Sanjay Narvekar playing Chhatrapati Shivaji Maharaj in Sangeet Sant Tukaram)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.