Photo : ‘चला हवा येऊ द्या’चा ‘नाटक अनलॉक’ विशेष भाग, कलाकार मंडळीची हजेरी

‘चला हवा येऊ द्या’संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
(‘Drama Unlock’ special episode of ‘Chala Hawa Yeu Dya’)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:21 PM, 5 Dec 2020
‘चला हवा येऊ द्या’संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
झी मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतेच, मात्र मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या अनेक नवनवीन उपक्रमांसाठी देखील पुढाकार घेत असते.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जवळपास गेली 9 महिने नाट्यगृह बंद होती त्यामुळे नाट्यप्रेमींना अनेक दर्जेदार नाटकांना मुकावं लागलं.
येत्या १२ डिसेंबरपासून झी मराठीची प्रस्तुती असलेल्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकापासून पुन्हा रंगभूमीवर तिसरी घंटा वाजणार आहे.
पुण्यातून या नाटकाचा पुन्हा शुभारंभ होतोय, त्याचबरोबर इतर व्यावसायिक नाटकंही सज्ज झाली आहेत, याचेच औचित्य साधून चला हवा येऊ द्यामध्ये निर्मिती सावंत, वंदना गुप्ते, प्रतीक्षा लोणकर, अद्वैत दादरकर, कविता मेढेकर, सुनील तावडे, सलील कुलकर्णी, संदीप खरे, राहुल देशपांडे या कलाकार मंडळींनी हजेरी लावली.