AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जब वी मेट’च्या अभिनेत्यासोबत लग्न बंधनात अडकली अक्षय खन्नाची ‘ही’ अभिनेत्री, पाहा सध्या काय करतेय…

हिंदी मनोरंजन विश्वात 90चे दशक अतिशय संस्मरणीय मानले जाते. या दशकात अनेक महान कलाकारांची कारकीर्द बहरली होती. 90च्या दशकातच अनेक नवोदित अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात देखील केली होती. अशा नवोदित अभिनेत्रींपैकी एक होती अंजला झवेरी (Anjala Zaveri).

‘जब वी मेट’च्या अभिनेत्यासोबत लग्न बंधनात अडकली अक्षय खन्नाची ‘ही’ अभिनेत्री, पाहा सध्या काय करतेय...
अंजला झवेरी
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 9:06 AM
Share

मुंबई : हिंदी मनोरंजन विश्वात 90चे दशक अतिशय संस्मरणीय मानले जाते. या दशकात अनेक महान कलाकारांची कारकीर्द बहरली होती. 90च्या दशकातच अनेक नवोदित अभिनेत्रींनी आपल्या करिअरची सुरुवात देखील केली होती. अशा नवोदित अभिनेत्रींपैकी एक होती अंजला झवेरी (Anjala Zaveri). अंजला झवेरीला 90च्या दशकांत चाहते ‘नॅचरल ब्युटी’ या नावाने ओळखत होते (Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family).

सौंदर्यात बड्या बड्या अभिनेत्रींना टक्कर देणाऱ्या अभिनेत्री अंजला झवेरीने अक्षय खन्नाबरोबर मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. पण, आता बर्‍याच काळापासून अभिनेत्री चित्रपटांच्या दुनियेपासून दूर असून एकांतात आपले जीवन जगत आहे. चला तर जाणून घेऊया की ही अभिनेत्री सध्या काय करतेय…

अक्षय खन्नासोबत डेब्यू

अंजला झवेरीचा शोध विनोद खन्ना यांनी घेतला होता. जेव्हा विनोद खन्ना ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून मुलगा अक्षय खन्ना लाँच करणार होते, तेव्हा ते एका नवीन चेहऱ्याच्या शोधात होते. अशा वेळी विनोद खन्नांचा शोध अंजला झवेरीवर येऊन थांबला. हा चित्रपट फ्लॉप ठरला असला तरी, हे दोन्ही नवखे कलाकार प्रेक्षकांना परिचित झाले.

अरबाजसह जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली

अंजलाने बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले, पण या सर्वात तिला अपेक्षित असे यश मिळाले नाही. अभिनेत्रीचा ‘जब प्यार किया तो डरना क्या’ हा चित्रपट हिट ठरला. मात्र, या चित्रपटातही ती फक्त एका सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात ती अरबाज खान सोबत दिसली होती. सलमान खान आणि काजोल या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाशिवाय अंजलाच्या वाट्याला इतर यशस्वी बॉलिवूड चित्रपट आलेच नाहीत (Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family).

टॉलिवूडमध्येही अभिनयाची छाप

बॉलिवूडमध्ये जास्त यश न मिळाल्याने अंजला टॉलिवूडकडे वळली. दक्षिणेत अभिनेत्रीला चांगले यश मिळाले ही मोठी गोष्ट आहे. अंजलाने नागार्जुन, नंदामुरी बालकृष्ण, सुदीप आणि मामूट्टी सारख्या कलाकारांसह मोठ्या पडद्यावर काम केले आणि इथेच तिच्या नावावर अनेक यशस्वी चित्रपट लिहिले गेले. मात्र, आता अभिनेत्रीनेही दक्षिणच्या चित्रपटांपासूनही स्वत:ला दूर केले आहे. अंजला झवेरी शेवट 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलुगू चित्रपट ‘लाईफ इज ब्यूटीफुल’मध्ये दिसली होती.

‘या’ अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ

अंजला झवेरीने अभिनेता तरुण अरोराशी लग्न केले आहे. ‘जब वी मेट’ या चित्रपटात तरुण अरोराने काम केले होते. त्या चित्रपटात तो करीना कपूरच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसला होता. आता अंजला लग्नानंतर शांततेत आपले वैयक्तिक जीवन जगत आहे. आता ती आपला पूर्ण वेळ केवळ परिवाराला देत आहे.

(Actress Anjala Zaveri marries actor Tarun Arora and spending time with family)

हेही वाचा :

So Expensive : सोनम कपूरचा क्लासी अवतार, ड्रेसची किंमत लाखाच्या घरात

Video : आधी स्वत:च्या लग्नात झिंगाट डान्स, आता ‘मला म्हणतात हो पुण्याची मैना’वर बहारदार नृत्य, श्वेता शिंदेचा व्हिडीओ व्हायरल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.