AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतदेह मिळाला

बॉलिवूडमधील अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद मृत्यू झालाय.

बॉलिवूड अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतदेह मिळाला
| Updated on: Dec 13, 2020 | 9:01 AM
Share

कोलकाता :  बॉलिवूडमधील अभिनेत्री आर्या बॅनर्जी हिचा संशयास्पद मृत्यू झालाय. दक्षिण कोलकात्याच्या तिच्या राहत्या घरी तिचा मृतदेह कोलकाता पोलिसांना मिळाला. घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये घरात प्रवेश केला असता रक्ताने माखलेला मृतदेह पोलिसांच्या नजरेस पडला.  (Actress Arya banerjee Died In Kolkata)

आर्याच्या नाकातून रक्त वाहत होतं तर खोलीमध्ये तिने उलट्या केल्या होत्या. आर्याच्या घरातून पोलिसांनी काही औषधे आणि दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

दिवंगत सितार वादक निखील बंडोपाध्याय यांची आर्या ही कन्या आहे. ती 33 वर्षांची होती. आर्या बॅनर्जी हिने द डर्टी पिक्चरमध्ये काम केलं होतं. त्याचबरोबर आर्याने डर्टी चित्रपटासोबतच ‘लव्ह सेक्स अँड चीटिंग’ या चित्रपटात काम केले आहे.

चित्रपटसृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय वाईट गेले आहे. दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्री यांनी याच वर्षी जगाला निरोप दिलाय. 2020 अंतिम टप्प्यामध्ये असताना आणखी आर्याच्या निधनाची बातमी आली आहे.

मागील काही दिवसांपासून आर्या आपलं जेवण ऑनलाईन ऑर्डर करत होती. अनेक दिवसांपासून ती अपसेट मूडमध्ये होती. सहकाऱ्यांबरोबर ती संवाद साधत नव्हती. तसंच ती कुणाला भेटतही नव्हती. तिच्या कॉल डिटेल्सची चौकशी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Actress Arya banerjee Died In Kolkata)

संबंधित बातम्या

सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.