AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस फार्महाऊसवर…कशी झाली फसवणूक?

काँट्रॅक्ट वाचून झाल्यावर काहीतरी गडबड असल्याचे फरहानाला समजले. त्यानंतर तिने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. कथित दिग्दर्शकाने मला त्याच्या खोलीत बोलावले होते , असे तिने सांगितले आहे.

दिग्गज अभिनेत्रीसोबत कास्टिंग काऊचची भयंकर घटना, कित्येक दिवस फार्महाऊसवर...कशी झाली फसवणूक?
farhana bhatt Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2026 | 9:45 PM
Share

Farhana Bhatt Casting Couch : बॉलिवुड हे मोठं मृगजळ आहे. हिरोईन बनवतो अशा भुलथापा देत आतापर्यंत अनेक तरुणींसोबत इथे मोठे मोठे स्कॅम झालेले आहेत. काही तरुणींना तर कास्टिंग काऊचलाही सामोरे जावे लागले आहे. सध्या अशाच एका अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव समोर आला आहे.

या अभिनेत्रीचे नाव फरहाना भट्ट असे आहे. ही अभिनेत्री लवकरच खतरों के खिलाडी सिझन 15 मध्ये झळकणार आहे. या सिझनची सध्या शूटिंग चालू आहे. याआधी या अभिनेत्रीने लैला मजून, सिंघम अगेन अशा चित्रपटांत काम केलेले आहे. तिने दैनिक भास्करशी बोलताना तिच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटनेबाबत सांगितले आहगे.

दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावे लागेल

करिअरच्या सुरुवातीला तिला एका महिलेने तुला हिरोईन करते असे सांगत मुंबईत आणले. लवकरच शूटिंग होणार असून हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे, असे मला सांगण्यात आले. परंतु मी मुंबईत गेल्यानंतर मला एका कथित दिग्दर्शकाच्या घरी नेण्यात आले. त्या दिवशी मला रात्री काँ न्ट्रॅक्ट वाचायला देण्यात आले. त्या काँट्रॅक्टमध्ये अनेक अजब अटी होत्या. त्यातच काही आठवडे तुला दिग्दर्शकाच्या फार्महाऊसवर राहावे लागेल, अशीही अट टाकण्यात आली होती, अशी आठवण फरहानाने सांगितली आहे.

दिग्दर्शकाने खोलीमध्ये बसवून ठेवलं

काँट्रॅक्ट वाचून झाल्यावर काहीतरी गडबड असल्याचे फरहानाला समजले. त्यानंतर तिने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरू केला. कथित दिग्दर्शकाने मला त्याच्या खोलीत बोलावले होते. मी खूप घाबरले होते, असेही तिने सांगितले. त्यानंतर मला त्या दिग्दर्शकाने खोलीमध्ये कित्येक तास बसवून ठेवलं. सुरक्षेसाठी मी फुलदान जवळ घेतले होते. माझ्यासोबत काही घडले तर मी थेट हल्ला करणार होते, असी आठवण तिने सांगितली.

कशीबशी अभिनेत्री बाहेर पडण्यात यशस्वी ठरली

काहीतरी विचित्र घडणार असल्याचे समजताच नंतर या अभिनेत्रीने त्या दिग्दर्शकावर दबाव टाकला आणि ती तेथून यशस्वीपणे बाहेर पडली. तेथून बाहेर पडल्यावर मी माझ्या मैत्रिणीसोबत परत श्रीनगरमध्य आलो, असे तिने सांगितले. दरम्यान, आता फरहानाचा हा अनुभव समोर आल्यानंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Follow Us
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण