Resolution | तौबा, तौबा… आता बोल्ड सीन्स नाहीत, नववधू गौहर खानची घोषणा

मुंबई : अभिनेत्री गौहर खानने ख्रिसमसमध्ये जैद दरबारशी लग्न केलं (Gauhar Khan Say No To Bold Scenes). या दोघांच्या शाही लग्न सोहळ्याचे अनेक फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नानंतर गौहर ही अली अब्बास जफरच्या वेब शो ‘तांडव’मध्ये दिसणार आहे. तांडवचा ट्रेलर रिलीझ झाल्यापासून तिचं खूप कौतुक होत आहे. गौहरने एका मुलाखतीत सांगितलं की यापूर्वी तिने […]

Resolution | तौबा, तौबा... आता बोल्ड सीन्स नाहीत, नववधू गौहर खानची घोषणा
Nupur Chilkulwar

|

Jan 07, 2021 | 3:23 PM

मुंबई : अभिनेत्री गौहर खानने ख्रिसमसमध्ये जैद दरबारशी लग्न केलं (Gauhar Khan Say No To Bold Scenes). या दोघांच्या शाही लग्न सोहळ्याचे अनेक फोटो त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नानंतर गौहर ही अली अब्बास जफरच्या वेब शो ‘तांडव’मध्ये दिसणार आहे. तांडवचा ट्रेलर रिलीझ झाल्यापासून तिचं खूप कौतुक होत आहे. गौहरने एका मुलाखतीत सांगितलं की यापूर्वी तिने अनेक शोजला नकार दिला. त्याचं कारण होतं बोल्ड सिन्स (Gauhar Khan Say No To Bold Scenes).

गौहरने हिन्दुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “विना कारण मी बोल्ड सिन्स करणार नाही, असा निर्णय घेतला आहे. एक अभिनेत्री असल्याने माझं काम आहे की मा माझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहू. पण मी स्वत: काही मर्यादा ठरवल्या आहेत. त्यानुसार, मी कुठल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ती लाईन क्रॉस नाही करु शकत”.

“आतापर्यंत जितकेही रोल मला मिळाले, त्या भूमिका तशा नव्हत्या ज्या मला मनापासून कराव्याशा वाटल्या, त्यामुळे कितीही मोठे प्रोजेक्ट असले तरी मी त्यांना नकार दिला”, असंही ती म्हणाली (Gauhar Khan Say No To Bold Scenes ).

गौहर ’14 फेरे’ सिनेमात दिसणार

रिपोर्ट्सनुसार, गौहर ‘तांडव’नंतर आता अभिनेता विक्रांत मेस्सी आणि किर्ती खरबंदासोबत ’14 फेरे’ या सिनेमात दिसणार आहे. ’14 फेरे’ हा एक कॉमेडी सिनेमा आहे. गौहर यामध्ये मुख्य भूमिकेत असणार आहे. लखनौमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु केलं आहे. तिचा पती जैद दरबार हा देखील लखनौमध्ये आहे. या सिनेमाचं शूटिंग नोव्हेंबर 2020 पासून सुरु झालं होतं.

Gauhar Khan Say No To Bold Scenes

संबंधित बातम्या :

Photo : ‘एक दुजे के लिए’, गौहर खान आणि जैद दरबारचे रोमॅन्टिक फोटो

Photo : हॅप्पी न्यू ईयर ,गौहर आणि जैदकडून नववर्षाच्या खास शुभेच्छा

Photo : कपल गोल्स, गौहर खान आणि जैद दरबारचं खास फोटोशूट

Photo : ‘कुबुल है’ म्हणत गौहर आणि जैदचा निकाह संपन्न, पाहा फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें