फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल

अभिनेत्री केतकी चितळे विरोधात भांडूपच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली (Ketaki Chitale facebook post) आहे.

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट, अभिनेत्री केतकी चितळेविरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने अभिनेत्री केतकी चितळे विरोधात भांडूपच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली (Ketaki Chitale facebook post) आहे. केतकीने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. तिच्या या पोस्टवर काही आंबेडकर विचारवादी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच यावरुन तिलाही ट्रोलही करण्यात येत आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने काल (1 मार्च) रात्री फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात तिने “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असे लिहिले आहे.

या फेसबुक पोस्टवरुन तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. तसेच या फेसबुक पोस्टमधील नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क या वाक्यावर काही आंबेडकर विचारवादी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.

या लिखाणावरुन त्यांचा नवबौद्ध समाजाबद्दल त्यांच्या पानातील द्वेष समोर येतो. आम्ही त्यांच्या या लिखाणाचा जाहीर निषेध करतो. तसेच त्यांच्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर विचारवादी नेत्यांनी केली (Ketaki Chitale facebook post) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *