AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maliaka Arora : बॉलिवूड हादरले… मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसला आहे. मलायका हिच्या वडिलांनी आत्महत्या केली आहे. तिच्या वडिलांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. आयेशा मनोरा या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली.

Maliaka Arora : बॉलिवूड हादरले... मलायका अरोराच्या वडिलांचा टोकाचा निर्णय; 6 व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले
| Updated on: Sep 11, 2024 | 5:48 PM
Share

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसला आहे. मलायका हिच्या वडिलांनी, अनिल अरोरा यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून अनिल यांनी आयुष्य संपवलं. आयेशा मनोरा या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी प्राथमिक चौकशीला सुरूवात केली आहे. मात्र मलायकाच्या वडिलांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, त्यामागचं नेमकं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही.   त्यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणास्तव केली, गेल्या काही दिवसांत अशा काही घटना घडल्या आहेत का ज्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागलं असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

वडिलांच्या आत्महत्येची बातमी कळली तेव्हा मलायका ही  पुण्यात होती. तेथून ती लागलीच मुंबईच्या दिशेने रवाना झाली अशी माहिती समोर आली आहे.

जुलै 2023 मध्ये हॉस्पिटमध्ये दाखल होते अनिल अरोरा 

गेल्या वर्षी प्रकृतीच्या कारणामुळे मलायकाचे वडील मुंबईतील रुग्णालयात दाखल होते. त्यावेळी मलायका अनेक वेळेस तिच्या आईसोबत, जॉय यांच्यासह हॉस्पिटलमध्ये दिसली होती. मात्र तिच्या वडिलांना नेमकं काय झालं होतं, त्यांच्यावर कसले उपचार सुरू होते, हे स्पष्ट झालं नाही.

महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.